Astrology Tips : सावधान! तुमच्या 'या' 10 सवयी अत्यंत धोकादायक; वेळीच त्या बदला, अन्यथा...
आपल्या दैनंदिन जीवनात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या नकळतपणे करतो. पण, वास्तूशास्त्रानुसार, अशा गोष्टी करणं म्हणजे वास्तूशास्त्राचा दोष लागणे असा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगॅस बंद असताना त्यावर तवा किंवा कढई ठेवू नये.
वास्तूशास्त्रानुसार, गॅसवर तवा किंवा कढई ठेवल्याने अग्नीला आस लागते.
जुना तवा किंवा कढई कोणाला देऊ नये.
असे केल्यास, तुमची कमाई इतरांसोबत वाटली जाते.
कणिक रात्री मळून फ्रिजमध्ये ठेवू नये. यामुळे देवी अन्नपूर्णेचा अपमान होतो.
संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळल्यानंतर कोणालाही दही देऊ नये.
तुम्ही दही इतरांना वाटल्याने तुम्ही कोणतीही केलेली उपासना वाया जाते.
पोळपाट किंवा लाटण खूप वेळेपर्यंत न धुता ठेवू नये. यामुळे घरातील लोकांची भूक मरते.
रात्री बाहेर कपडे वाळत घालू नये. कारण, जर तुम्ही असे केल्यास बाह्य बाधा लागू शकते.
पतीला खाऊ पिऊ न घालता घराबाहेर जाऊ देऊ नये.
असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते अशी मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)