एक्स्प्लोर

Shravan Somvar 2024 : श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? शास्त्र सांगते...

Shravan Somvar 2024 : श्रावण महिन्यात शिवशंकराची पूजा केली जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी पिंडीवर शिवामूठ वाहिली जाते, यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते. शिवामूठ वाहताना मंत्र म्हणण्याची देखील पद्धत आहे.

Shravan Somvar 2024 : श्रावण महिना हा शिवशंकराच्या पूजेला समर्पित आहे, त्यामुळे या महिन्यातील सोमवारांना देखील विशेष महत्त्व आहे. शिवभक्त श्रावणी सोमवारचं व्रत करतात, या दिवशी कडक उपवास पाळला जातो. श्रावणातील दर सोमवारी शिवमूठ (Shivamuth) वाहण्याची पद्धत आहे. ही शिवमूठ म्हणजे नेमकं काय? आणि शिवामूठीत काय वाहिलं जातं आणि यावेळी कोणता मंत्र म्हटला जातो? सविस्तर जाणून घेऊया.

तब्बल 18 वर्षांनंतर यंदा श्रावणात 5 सोमवार असतील. प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवमूठ महादेवाला अर्पण केली जाते. शिवामूठ वाहिल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते.

कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ वाहावी?

पहिला सोमवार – 05 ऑगस्ट, पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी.
दुसरा सोमवार – 12 ऑगस्ट, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी.
तिसरा सोमवार – 19 ऑगस्ट, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.
चौथा सोमवार – 26 ऑगस्ट, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.
पाचवा सोमवार – 02 सप्टेंबर, पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा वाहावी.

कशी वाहावी शिवमूठ? (How to offer Shivamuth)

श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी सर्वप्रथम त्याला पाणी, दूध, 11 बेलाची पानं, फुलं अर्पण केली जातात. पूजा करताना धूप लावावं, त्यानंतर महादेवाला खडीसाखर अर्पण करावी. त्यानंतर शिवमूठ अर्पण करावी. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.

शिवमूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा? (Shivamuth Mantra)

शिवमृठ अर्पण करताना "ओम नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने । शृंगिभृंगि महाकालगणयुक्ताय शंभवे।।" हा मंत्र म्हणावा.  किंवा "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा" असं तीन वेळा म्हणावं.

शिवमूठ वाहण्याचं महत्त्व (Shivamuth Significance)

शिवमूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो आणि ती प्रत्येक महिलेनं वाहावी, असं सांगितलं जातं. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षं महाराष्ट्रात स्त्रिया हे व्रत करतात. श्रावणातील 5 सोमवार शिवमूठ वाहिल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात, असं सांगितलं जातं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shravan 2024 : श्रावण मासाला सुरुवात; पहिल्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?                                                                         

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 October 2026: आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026 : 18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
Navratri Chinnamasta Devi 2026 : डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget