एक्स्प्लोर

Shravan 2024 : आजपासून श्रावण सुरू; पहिल्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?

Shravan 2024 : श्रावण महिन्याची सुरुवात आता झाली आहे. यंदा 71 वर्षांनंतर श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते.

Shravan 2024 : श्रावण (Shravan 2024) महिन्यात अनेक व्रत वैकल्य असतात. यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होत असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. येत्या 5 ऑगस्टपासून श्रावणाची सुरूवात होत आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवमूठ (Shiv Muth) अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवमूठ महादेवाला अर्पण केली जाते.

यंदा श्रावणात किती सोमवार आणि कोणती शिवमूठ वाहावी?

पहिला सोमवार – 05 ऑगस्ट, पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी.
दुसरा सोमवार – 12 ऑगस्ट, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी.
तिसरा सोमवार – 19 ऑगस्ट, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.
चौथा सोमवार – 26 ऑगस्ट, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.
पाचवा सोमवार – 02 सप्टेंबर, पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा वाहावी.

श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.

शिवाची पूजा कशी करावी?

प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शंकराच्या फोटोची पूजा करावी. शंकराचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी. ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकता.

शिवामूठ व्रत करण्याची पद्धत

विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्‍या चार/पाच सोमवारी चार/पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. विवाहानंतरची पहिली पाच वर्षं क्रमवार हे व्रत केलं जातं.

कोणकोणते सण-व्रत साजरे केले जाणार?

या पवित्र मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचं व्रत, अशी अनेक व्रतं केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत केलं जातं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shravan 2024 : तब्बल 71 वर्षांनंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून; 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ                                                                                     

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Embed widget