Navratri 2024 Wishes : नवरात्रीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Navratri 2024 Wishes In Marathi : नवरात्रीत घटस्थापनेसोबत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. गरबा-दांडीया खेळून हा उत्सव साजरा केला जातो. या सणानिमित्त तुम्ही प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवू शकता.
Navratri 2024 Wishes In Marathi : आश्विन महिना सुरू झाला की शारदीय नवरात्रीच्या (Shardiya Navratri 2024) उत्सवाला सुरुवात होते. या काळात दुर्गा देवीच्या 9 रुपांची विधीवत पूजा केली जाते. यंदा हा नवरात्री उत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या दिवशीच घटस्थापना होईल. तर 12 ऑक्टोबरला दसऱ्याला नवरात्री संपेल. यंदा नवरात्रीचा कालावधी दहा दिवसांचा असणार आहे. नवरात्रीनिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा (Navratri Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता.
नवरात्री शुभेच्छा संदेश (Navratri Wishes In Marathi)
नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे..
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!
नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा!
शक्ती अंगी येते आई नाव तुझे घेता
चैतन्य अंगी येते रूप तुझे पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि देवी दुर्गेचा आशिर्वाद असो
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!
ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन पालखीत स्वार
देवी आली आहे
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नऊ रात्रीला
करूया देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
या देवी सर्वभूतेषु
शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी,
नारायणी नमोस्तुते…
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या
हार्दिक शुभेच्छा…
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धी आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो
हीच मातेकडे प्रार्थना...
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा:
Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्रीला सुरुवात; जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त आणि अचूक पूजा विधी