Shardiya Navratri 2024 : देशभरात नवरात्रीचा (Shardiya Navratri 2024) उत्सव जल्लोषात आहे. आज देवीची सातवी माळ आहे याला महासप्तमी असंही म्हणतात. त्यानुसार आज देवी दुर्गेच्या सातव्या रुपाची म्हणजेच देवी कालरात्रीची (Devi Kalratri) पूजा केली जाते. देवी कालरात्रीला आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी मानली जाते अशी पौराणिक मान्यता आहे.
देवी कालरात्रीचे रूप
नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच महासप्तमीच्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. शुंभ निशुंभाचा नाश करण्यासाठी दुर्गा मातेने कालरात्रीचे रूप धारण केले होते असे मानले जाते. मातेचे रूप कालिका म्हणजेच काळ्या रंगाचे असून केस सर्व दिशांना पसरलेले आहेत.मातेचा रंग तिच्या नावाच्या घनदाट अंधारासारखा काळा आहे. तिला तीन डोळे आहेत आणि केस मोकळे आहेत. देवी कालरात्रीच्या गळ्यात माळ आहे. तलवार आणि काटे ही त्यांची शस्त्रे आहेत. गाढवावर स्वार होणार्या कालरात्रीला शुभंकारी असेही म्हणतात.
देवी कालरात्री पूजा विधि
देवी कालरात्रीच्या पूजेमध्ये निळ्या रंगाचे कपडे परिधान करा. कालरात्री देवीला कुंकू टिळा लावा, जास्वंद फुले अर्पण करा. गूळ हा कालरात्री देवीचा आवडता नैवेद्य मानला जातो. क्लिम ऐन श्रीम कालिकाय नम: जितका शक्य असेल तितका 'ओम फट शत्रुयेण सघय घटाय ओम' चा जप करा. या पद्धतीने देवी कालरात्रीची पूजा केल्याने भक्तांचे अनिष्टतेपासून रक्षण होते, असे मानले जाते.
देवी कालरात्री मंत्र
ॐ कालरात्र्यै नम:
क्लीं ऐं श्रीं कालिकायै नम:
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी॥ वामपादोल्लसल्लोह लताकण्टकभूषणा। वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥
'ॐ फट् शत्रून साघय घातय ॐ।'
'ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै ऊं कालरात्रि दैव्ये नम:
देवी कालरात्रीला 'हा' नैवेद्य अर्पण करा
कालरात्रीला मालपोहे अर्पण केले जातात. त्यामुळे या दिवशी विधीनुसार देवी कालरात्रीची पूजा केल्यानंतर मालपोह्याचा नैवेद्य दाखवावा. ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै। या मंत्राचा 108 वेळा जप करावा. अशा प्रकारे देवीची पूजा केल्याने देवी प्रसन्न होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Gochar 2024 : शनीचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींच्या आर्थिक अडचणीत होणार वाढ, एकामोगामाग येतील संकटं