Shani Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये शनी (Lord Shani) हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. 3 ऑक्टोबर रोजी शनीने (Shani Dev) राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनी 27 डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात असणार आहेत. शनी राशीनुसार वेळोवेळी नक्षत्र परिवर्तन करतात. याचाच परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होतो. त्यामुळेच शनीच्या शतभिषा नक्षत्राचा कोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ आणि कोणत्या राशींसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले असेल. तसेच, तुमच्या तब्येतीबद्दल असलेल्या तक्रारी हळूहळू दूर होतील.  तसेच, मित्रांचा सहवास लाभल्यामुळे तुमची अनेक कामे सहज पूर्ण होतील. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणं फार शुभ आणि सकारात्मक मानलं जाणार आहे. अनेक दिवासांपासून कोर्ट कचेरीच्या संदर्भात तुमचे सुरु असलेले वाद लवकरच संपतील. तसेच, तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही बाहेर फिरायला देखील जाऊ शकता. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन सामान्य असणार आहे. या काळात तुमचा अनेक वर्षांपासून वडिलोत्पार्जित संपत्तीचा सुरु असलेला वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तुम्हाला व्यवसायात धोका मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा.


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील. तुम्हाला नकारात्मकतेची भावना जाणवेल आणि त्यामुळे दिवसभर कामात उत्साह राहणार नाही. तब्येतीच्याही तक्रारी जाणवतील. 


मकर रास (Capricorn Horoscope)


शनीचं राहू नक्षत्रात परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढून मनसोक्त फिरू शकता. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, या काळात जोडीदाराकडून तुम्हाला चांगली भेटवस्तू देखील मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Astrology Panchang 09 October 2024 : आज सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; धनुसह 'या' 5 राशींच्या धन-संपत्तीत होणार भरभराट