Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्रौत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून प्रारंभ होतो. यंदा 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीची सुरुवात होत आहे. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा देवीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीचे 9 दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहेत. या राशींवर देवी दुर्गेची कृपा राहील आणि त्यांचं भाग्य उजळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे 9 दिवस शुभ ठरणार आहेत. या काळात तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही गाडी किंवा घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. हा काळ गुंतवणूक करण्यासाठी अतिशय शुभ राहील. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल. या राशीचे लोक ज्यांना शिक्षण, नोकरीसाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा देवी दुर्गेच्या कृपेने पूर्ण होईल. या काळात घरातील मुलं आनंदी राहतील आणि तुमचा जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे 9 दिवस अनुकूल असतील. कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांना काही अधिकृत पद मिळू शकतं. या काळात सिंह राशीच्या लोकांना इतरांकडून आदर मिळेल. व्यावसायिकांना या काळात मोठी डील मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील, त्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल आणि प्रगतीही होईल. 


धनु रास (Sagittarius)


नवरात्रीचे 9 दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरतील. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता. व्यवसायाशी संबंधित लोक उत्कृष्ट कामगिरी करतील, व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांचा मान-सन्मान देखील वाढेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची किंवा त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या नशिबाचे तारे तुम्हाला साथ देतील आणि तुमची प्रलंबित कामंही पूर्ण होऊ शकतात. सरकारी योजनांचाही तुम्हाला लाभ मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Guru Vakri : 9 ऑक्टोबरपासून पालटणार 'या' 3 राशींचं नशीब; गुरू चालणार वक्री चाल, बँक बॅलन्समध्ये होणार अपार वाढ