Share Market News : शेअर बाजारात (Share Market) सातत्यानं नवनवीन घडोमाडी होताना दिसत आहेत. कधी तेजी पाहायला मिळत आहे. तर कधी शेअर्समध्ये घसरण जाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. रिलायन्स समूहाची हाऊसिंग फायनान्स कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या (Reliance Home Finance Limited) शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे.


कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढून 4.36 रुपयांच्या उच्चांकावर


उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होत आहे.  रिलायन्स ग्रुपची हाउसिंग फायनान्स कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (Reliance Home Finance Limited). गेल्या शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढून 4.36 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. अनिल अंबानी या कंपनीचे कर्ज सातत्याने कमी करत आहेत. निधी उभारण्यावर भर देत आहेत. त्याचा परिणाम शेअर्सवर दिसून येत आहे. येथे, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की त्यांनी संजय पी शिंदे यांची कंपनीच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.


एलआयसीकडे कंपनीची मोठी भागिदारी 


Reliance Home Finance Ltd मध्ये सार्वजनिक भागीदारी 99.26 टक्के आहे. तर, प्रवर्तक असलेल्या अनिल अंबानी कुटुंबाची हिस्सेदारी 0.74 टक्के आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीकडे कंपनीची मोठी भागिदारी आहे. एलआयसीकडे रिलायन्स कंपनीचे 74,86,599 शेअर्स म्हणजेच 1.54 टक्के शेअर्स आहेत.


रिलायन्स होम फायनान्सचे शेअर्स गेल्या पाच दिवसात 15 टक्क्यांनी वधारले


रिलायन्स होम फायनान्सचे शेअर्स गेल्या पाच दिवसात 15 टक्क्यांनी वधारले आहेत. हा शेअर सहा महिन्यांत 45 टक्क्यांनी वाढला आहे. हा शेअर एका वर्षात 140 टक्क्यांपर्यंत वधारला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत 1 रुपये होती. परंतू शेअरमध्ये गुंतवणुकदारांचे दीर्घकाळात मोठे नुकसान झाले आहे. 22 सप्टेंबर 2017 रोजी या शेअरची किंमत 107 रुपये होती. म्हणजेच, आतापर्यंत सुमारे 96 टक्क्यांची मोठी घट झाली आहे. रिलायन्स होम फायनान्सचा शेअर 9 जानेवारी 2024 रोजी 52 आठवड्यांच्या उच्चांकी 6.22 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 17 ऑगस्ट 2023 रोजी शेअर 1.61 रुपयांवर होता. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


अनिल अंबानींची 'रिलायन्स पॉवर' कंपनी शेअर बाजारात सुस्साट, गुंतवणूकदारांची रांग; नेमकं कारण काय?