Shani Vakri 2024 : न्यायदेवता शनि (Shani) व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे चांगलं किंवा वाईट फळ देतो. शनि प्रत्येक राशीत खूप संथ गतीने प्रवास करतो, तो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो. इतका काळ शनि एकाच राशीत असला तरी त्याची स्थिती सतत बदलत असते. शनि कधी सरळ चालीत असतो, तर कधी वक्री. शनि सध्या कुंभ राशीत आहे आणि 29 जूनला तो वक्री स्थितीत जाईल.


कुंभ राशीत 15 नोव्हेंबरपर्यंत शनि उलट चालीत फिरेल. शनीची वक्री स्थिती अशुभ मानली जाते. यावेळी काही राशीच्या लोकांना आर्थिक समस्या, आरोग्याशी संबंधित समस्या, कायदेशीर वाद आणि कौटुंबिक वाद अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शनीच्या वक्री स्थितीमुळे कोणत्या राशींना फटका बसणार? जाणून घेऊया. 


शनीची चाल 'या' राशींवर पडणार भारी


मेष रास (Aries)


शनी प्रतिगामी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींचं आर्थिक नुकसान होईल. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद होऊ शकतात, वादही वाढू शकतो आणि दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. तुमची तब्येत बिघडू शकते. सर्व कामं बिघडण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे.


वृषभ रास (Taurus)


या राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती फारच अशुभ ठरणार आहे. शनीच्या उलट्या चालीचा परिणाम तुमच्या कामावर होईल. तुमच्या जीवनात अनेक चढउतार येतील, नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये तणावपूर्ण वातावरण असेल. जे लोक व्यापारी, व्यावसायिक आहेत त्यांचं नुकसान होईल. या काळात तुमचं जीवन आव्हानांनी भरलेलं असेल.


मकर रास (Capricorn)


या राशीच्या लोकांना शनीच्या उलट चालीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. या काळात तुमचं काही आर्थिक नुकसान होईल, व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होईल. या अडीच महिन्याच्या काळाच त्यांच आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. या राशीच्या व्यक्तीने यावेळी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती अशुभ ठरेल. या काळात तुम्हाला अशुभ परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नोकरी करणाऱ्यांसाठी कठीण काळ असेल, या काळात तुम्ही केलेलं काम बिघडू शकतं आणि यामुळे तुमचे बॉस तुमच्यावर रागवू शकतात. तसेच, यावेळी या काळात तुमच्या कामात काही अडचणी येऊ शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Monthly Horoscope June 2024 : जून महिना तुमच्यासाठी कसा राहील? नशिबाची कितपत साथ मिळणार? जाणून घ्या सर्व 12 राशींचे मासिक राशीभविष्य