Amitabh Bachchan Jaya Bachchan Wedding Anniversary : बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या लग्नाचा आज 51 वा वाढदिवस आहे. लग्नाला एवढे वर्ष होऊनही आजही त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. अमिताभ आणि जया यांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास आणि प्रेम आहे. तसेच ते एकमेकांना समजून घेतात. एकमेकांचा आदर करतानाही ते दिसून येतात. 


अमिताभ बच्चन आणि जया बच्चन 3 जून 1973 रोजी लग्नबंधनात अडकले. गेल्या 51 वर्षांमध्ये दोघांच्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. पण या चढ-उतारांवर त्यांनी मात केली. दोघांनी मिळून प्रत्येक गोष्टीचा सामना केला. एकमेकांच्या आयुष्यात आलेल्या वैयक्तिक घडामोडींचा त्यांच्या नात्यावर कधीही परिणाम झाला नाही. 


अमिताभ-जयाची पहिली भेट कुठे झाली? (Amitabh Bachchan Jaya Bachchan Love Story)


अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट 1970 मध्ये पुणे फिल्म इंस्टीट्यूटच्या एका इवेंटदरम्यान झाली. त्यावेळी अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तर जया बच्चन आधीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली होती. पुढे 'गुड्डी' या चित्रपटात दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. 


'गुड्डी'च्या सेटवर मैत्री, 'जंजीर'नंतर लग्न


'गुड्डी' या चित्रपटात जया बच्चन मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन पाहुणा कलाकार म्हणून होता. या चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली. पुढे 'जंजीर' या चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 'जंजीर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाच्या यशानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लग्नबंधनात अडकले. बिग बी यांच्या लग्नसोहळ्याला कोणत्याही बड्या कलाकाराने हजेरी लावली नव्हती. 


जया बच्चन यांनी सिमी ग्रेवाल यांच्या कार्यक्रमात एकदा खुलासा केला होता की, अमिताभ बच्चन एक उत्कृष्ट पिता आणि पती आहे. मुलांवर त्याचं खूप प्रेम आहे. पण रोमान्सच्या बाबतीत मात्र तो मागे आहे. अमिताभ बच्चन अजिबात रोमँटिक नाही". जया बच्चन उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली आई आणि पत्नी आहे. बिग बींना चांगल्या वाईट काळात त्यांनी साथ दिली आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले; म्हणाले,"ऐश्वर्या तुमची सून असूनही तुम्ही..."