Shani Dev : आणखी 3 महिने शनीची वक्री; नोव्हेंबरपर्यंत 'या' राशी होणार मालामाल, विविध स्रोतांतून होणार पैशाची आवक
Shani Vakri : शनि 30 जूनपासून वक्री चाल चालत आहे, ज्यामुळे 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. त्यांच्या धनसंपत्तीत वाढ होऊन समाजातील मान देखील वाढणार आहे.
![Shani Dev : आणखी 3 महिने शनीची वक्री; नोव्हेंबरपर्यंत 'या' राशी होणार मालामाल, विविध स्रोतांतून होणार पैशाची आवक Shani Vakri 2024 saturn transit in aquarius these zodiac signs will get rich and will live life king size till november Shani Dev : आणखी 3 महिने शनीची वक्री; नोव्हेंबरपर्यंत 'या' राशी होणार मालामाल, विविध स्रोतांतून होणार पैशाची आवक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/06/3e66df79a8bc3ec1dfd9d1532a04d1b61722928677608713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Vakri Positive Effects : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला (Shani Dev) न्याय देवता म्हणतात. जेव्हा जेव्हा शनिदेवाच्या हालचालीत बदल होतो, तेव्हा सर्व राशींच्या जीवनावर कोणत्या न कोणत्या प्रकारे परिणाम होत असतो. त्यात सध्या शनि कुंभ राशीत वक्री चाल चालत आहे. जूनपासून वक्री (Shani Vakri 2024) झालेला शनि नोव्हेंबरपर्यंत त्याच स्थित राहील. शनि वक्री 3 राशींसाठी शुभ ठरणार आहे. या काळात 3 राशींचं नशीब पालटेल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शनीची वक्री स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण शनि तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरात वक्री होत आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. संपत्तीच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. तसेच नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकतं.
धनु रास (Sagittarius)
शनीची वक्री स्थिती तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. तसेच, शनिदेव तुमच्या राशीनुसार धन घराचे स्वामी आहेत. त्यामुळे, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तसेच, या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल. या काळात लोक तुमच्या बोलण्यावर प्रभावित होऊ शकतात. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात चांगले फायदे होतील. उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना या दिशेने यश मिळू शकतं.
कुंभ रास (Aquarius)
शनिदेवाची उलटी चाल तुमच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. शनिदेवाने तुमच्या राशीत शश राजयोगही निर्माण केला आहे, त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच यावेळी तुम्ही लोकप्रिय व्हाल. तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळेल. राजकारणाशी संबंधित या राशीच्या लोकांना या काळात काही महत्त्वाचं यश मिळू शकतं. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखी होईल. तसेच, अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)