Shani Dev : कर्मफळदाता शनी (Shani Dev) सध्या आपल्या मूळ कुंभ राशीत आहे. शनी एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतो. जूनपर्यत शनी (Lord Shani) कुंभ राशीतच स्थित असणार आहे. 29 जून रोजी रात्री 11.40 वाजता शनी प्रतिगामी गतीने वाटचाल सुरु करणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीना कधी शनीची साडेसाती, ढैय्या आणि वक्र दृष्टीचा सामना करावा लागतो. काही राशीच्या लोकांना शनी प्रतिगामी झाल्यामुळे बरेच फायदे होतील. तर, काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. शनीच्या चालीमुळे कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीवर शनीच्या वक्री चालीचा परिणाम होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सावधानता बाळगण्याची गरज आहे. या दरम्यान तुम्हाला शारीरिक ताणाबरोबरच मानसिक ताणही जाणवू शकतो. पुढील 5 महिने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीवर देखील शनीच्या चालीचा परिणाम होणार आहे. या दरम्यान तुमचा तुमच्या कुटुंबियांबरोबर छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होऊ शकतो. याशिवाय या दरम्यान व्यवसायात गुंतवणूक करणे हानिकारक ठरू शकते. अनावश्यक रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, तब्येतीचीही काळजी घ्या. 


'या' राशींवर सुरु आहे शनीची साडेसाती 


सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीची साडेसाती सुरु आहे. त्यामुळे शनीच्या प्रतिगामी चालीमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. कामात काही अडथळे येऊ शकतात. त्यामुळे इतरांवर जास्त विश्वास ठेवू नका. कारण तुमचा विश्वासघात होऊ शकतो. मनात अनेक विचार येऊ शकतात. तसेच, अनावश्यक ताणामुळे थोडीफार चिडचिडही होऊ शकते. 


शनीची ढैय्या


सध्या कर्क आणि वृश्चिक राशीत शनीची ढैय्या चाल आहे. त्यामुळे या दोन्ही राशींनी सावध राहण्याची गरज आहे. विशेषत:कामाच्या ठिकाणी सतर्क राहा. विनाकारण चिडचिड करू नका. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; तूळसह 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ, धन-संपत्तीत होणार वाढ