Shani Uday 2024 : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला महत्त्वाचं स्थान आहे. शनीला (Shani) न्यायाचा देव देखील म्हटलं जातं, कारण तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनीच्या स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर पडतो. सध्या शनि कुंभ राशीत निजलेल्या अवस्थेत आहे. 18 मार्चला शनीचा उदय होईल आणि जूनपर्यंत शनीची स्थिती कायम राहील. काही राशींच्या लोकांसाठी शनीचा उदय (Shani Uday) फार शुभ मानला जातो. शनीच्या उदयामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा उदय खूप शुभ ठरणार आहे. शनीच्या उदयामुळे तुमचं नशीब उजळेल आणि या काळात तुम्हाला खूप लाभ मिळेल. शनीच्या उदयामुळे या राशींचा बँक बॅलन्स वाढेल. तुमचं उत्पन्न अनेक पटीने वाढेल. शनि उदयानंतर तुम्हाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. शनिदेवाच्या उदयाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. तुमच्या जीवनात आनंद येईल. नोकरी-व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. तुमची आर्थिक स्थिती या काळात खूप चांगली होईल.


तूळ रास (Libra)


शनीच्या उदयामुळे तूळ राशीच्या लोकांना अनेक शुभ परिणाम मिळतील. शनिदेव तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. या काळात तूळ राशीच्या लोकांच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. कुटुंब आणि मित्रांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल. शनिदेवाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत तुमची चांगली प्रगती होईल. शनीच्या कृपेने नोकरी-व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला चांगली पगारवाढ मिळेल.


धनु रास (Sagittarius)


शनीच्या उदयामुळे धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कामात भरपूर यश मिळणार आहे. शनीच्या कृपेने तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता किंवा नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला या काळात परदेशातूनही चांगली नोकरीची ऑफर येऊ शकते. शनि उदयानंतर धनु राशीच्या लोकांवर शनीचा विशेष आशीर्वाद राहील. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. शनिदेव तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ देतील. व्यवसायात तुम्ही एखादी मोठी डील फायनल करू शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Rajyog : बुध 'या' 3 राशींना करणार मालामाल; नीचभंग योग बनल्याने मिळणार चौफेर लाभ, कमवाल बक्कळ पैसा


Shani Uday : अवघ्या 2 दिवसांनी होणार शनीचा उदय; मेषसह 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, अपेक्षेपेक्षा अधिक पटीने पगारवाढ मिळणार