Neechbhang Rajyog :  ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह हे ठराविक काळानंतर आपली राशी बदलत असतात. ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होत असतो. बुध ग्रहाचा 15 मार्च रोजी मीन राशीत उदय झाला आहे. बुधाच्या या स्थितीमुळे मीन राशीत नीचभंग राजयोग तयार झाला आहे. 26 मार्चपर्यंत बुध (Mercury) या राशीत राहील, यानंतर बुध मेष राशीत प्रवेश करेल.


बुध ग्रहाची ही स्थिती काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे पुढील 11 दिवस सुखाचे असतील, या काळात तुमच्या नशिबाला कलाटणी मिळेल. नोकरदारांना सर्वांगीण लाभ होईल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. नेमक्या कोणत्या राशींना राजयोगाचा (Rajyog) फायदा होणार? जाणून घ्या.


मकर रास (Capricorn)


नीचभंग राजयोगाच्या निर्मितीमुळे मकर राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. हा राजयोग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक पटींनी फायदा होईल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची बिघडलेली कामं पूर्ण होऊ शकतील. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात भरीव यश मिळेल. यासोबतच तुमच्या सहाव्या घरात शनि आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप आर्थिक फायदा होईल. तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. बुद्धिमत्ता आणि वाणीशी संबंधित काम करणाऱ्या लोकांवर धनवर्षाव होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे, स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल.


तूळ रास (Libra)


या राशीच्या सहाव्या घरात नीचभंग योग तयार होत आहे. पुढील 11 दिवसांत बुध या राशीच्या लोकांना खूप लाभ देणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. यासोबतच तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांनाही लाभ मिळू शकतो. सोशल मीडिया आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळेल. पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. या काळात तुमचे अनावश्यक खर्च टळतील. यासोबतच तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे.


कर्क रास (Cancer)


या राशीच्या लोकांसाठी नीचभंग योग फायदेशीर ठरेल. पुढील 11 दिवसांच्या काळात या राशीच्या लोकांना प्रचंड आर्थिक लाभ मिळू शकतो. शेअर मार्केटमधूनही तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. यासोबतच तुम्हाला परदेशात जाऊन कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्यातही यश मिळवू शकता. याशिवाय फिल्म इंडस्ट्री, मॉडेलिंग आणि सोशल मीडियाच्या क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Uday : तीन दिवसांनी होणार शनीचा उदय; कुंभसह 'या' 4 राशी होणार मालामाल, आर्थिक स्थिती सुधारणार