Lok Sabha Election Dates : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण आज लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission of India) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 


निवडणुकांची घोषणा होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होणार 


लोकसभेच्या निवडणुका कधी जाहीर होणार? असा प्रश्न सर्वांनाचं पडला असेल. पण अखेर प्रतीक्षा संपली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. याकडं पत्रकार परिषदेकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण, यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. यावेळची लोकसभा निवडणूक ही 6 ते 7 टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. 


पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा दावा, तर पराभूत करण्याचा विरोधकांचा विश्वास


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. त्यामुळं आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपने पुन्हा तिसऱ्यांदा आम्हीच सत्तेत येऊ असा दावा केलाय. तर यावेळी भाजपला पराभूत करु असा विश्वास विरोधकांनी व्यक्त केलाय. त्यामुळं या निवडणुकीत जनता कोणाला मताचं दान देणार हा येणारा काळच ठरवणार आहे.  


2019 मध्ये 10 मार्चला झाला होती निवडणुकांची घोषणा


दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 10 मार्चला निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली होती. गेल्या वेळी 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी 67.1 टक्के मतदान झाले होते. तर 23 मे रोजी मतमोजणी झाली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.


2019 च्या निवडणुकीत भाजपला 303 जागा तर काँग्रेसला 52 जागा


2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 37.7 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली होती, तर NDA ला 45 टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या होत्या.


महत्वाच्या बातम्या:


ABP Majha Opinion Poll: लोकसभेला महाराष्ट्रात मविआ आणि महायुतीला किती जागा मिळणार? ओपिनियन पोलचा धक्कादायक निकाल