Shani Surya Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani Dev) आपली मूळ त्रिकोण रास म्हणजेच कुंभ राशीत 27 फेब्रुवारी रोजी अस्त होणार आहे. सध्या सूर्य आणि शनीची (Lord Shani) युती कुंभ राशीत होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि शनी एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळेच अस्त झाल्यानंतर अनेक राशींना संकटाचा सामना करावा लागणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीची ही अवस्था मिथुन राशीच्या लोकांसाठी नुकसानकारक असणार आहे. या राशीच्या नवव्या चरणात शनी अस्त होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळणार नाही. तसेच, तुम्हाला मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. पैशांची धनहानी होऊ शकते. त्यामुळे कोणत्याच गोष्टी पैशांची गुंतवणूक करु नका.
सिंह रास (Leo Horoscope)
शनीचं अस्त होणं सिंह राशीच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक ठरु शकतं. या काळात शनी सप्तम चरणात अस्त होणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या काळात कोणतीही पैशांची गुंतवणूक करु नका. तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागेल. तसेच, कोणाला पैसे देऊ देखील नका.
तूळ रास (Libra Horoscope)
शनीचं अस्त होणं तूळ राशीच्या लोकांसाठी फार हानिकारक असू शकतं. शनी या राशीच्या पंचम चरणात अस्त होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आर्थिक खर्चावर लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात अनेक समस्या भेडसावतील. तसेच, तुमच्या नात्यात दुरावा येण्याची देखील शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: