Astrology Panchang Yog 13 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज गुरुवारचा दिवस खास असणार आहे. आज गुरु स्वामी ग्रह वृषभ राशीत विराजमान होणार आहे. तसेच, आजच्या दिवशी गुरुसह त्रिकोण योग (Yog) जुळून आला आहे. यामुळे शोभनसह अन्य शुभ योगसुद्धा जुळून येणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा लाभ अनेक राशींच्या लोकांना होणार आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा चांगला सहभाग पाहायला मिळेल. आर्थिक बाबतीत तुमची परिस्थिती चांगली असेल. तसेतच, आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आई-वडिलांचा तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळेल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. आज तुमच्या कामात चांगली प्रगती होईल. तुमचे मन प्रसन्न असेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक झालेलं पाहायला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. त्यामुळे तुम्ही फार उत्साही असाल. सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल. तसेच, मित्रांचा चांगला पाठिंबा पाहायला मिळेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज सरकारी योजनांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, लवकरच तुम्ही परदेशी यात्रा करु शकता. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात देखील आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, उच्च अधिकारी वर्ग तुमच्या कामाने खुश होतील. कामाच्या ठिकाणी तुमचं प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे. तसेच, कुटुंबात सुख-शांती टिकून राहील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 13 February 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य