Astrology : शनि आणि गुरू प्रतिगामी, या सहा राशीच्या लोकांनी घ्या काळजी, होईल मोठे नुकसान
Astrology : पंचांगानुसार 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. गुरू हा सध्या मीन राशीत प्रतिगामी आहे. तो 29 जुलै 2022 रोजी मीन राशीत मागे होता.

Astrology : जिथे शनि कर्माचा दाता आहे, तिथे गुरू म्हणजेच देव गुरु बृहस्पती हा ज्ञानाचा कारक आहे. परंतु, सध्या हे दोन्ही ग्रह प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करत आहेत.
मकर राशीत शनिदेव सद्या उलट फिरत आहेत. विशेष म्हणजे शनि स्वतःच्या राशीत मागे जात आहे. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या घरात म्हणजेच स्व-राशीत असतो तेव्हा तो शुभ मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार शनि जेव्हा प्रतिगामी असतो तेव्हा मकर राशीला त्रास होतो.
पंचांगानुसार 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनि मकर राशीत भ्रमण करत आहे.
गुरू हा सध्या मीन राशीत प्रतिगामी आहे. तो 29 जुलै 2022 रोजी मीन राशीत मागे होता.
पंचांगानुसार गुरु आता 24 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा मीन राशीत मार्गी होईल. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीचा स्वामी गुरु आहे.
मिथुन , तूळ, धनु , मकर, कुंभ आणि मीन या राशींना जोपर्यंत गुरू आणि शनि प्रतिगामी आहेत तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल. तोपर्यंत या सात राशींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे
मिथुन, तूळ, मकर, धनु, कुंभ आणि मीन राशीवर शनीची दृष्टी आहे. यातून मिथुन आणि तूळ राशीवर शनीची धुरा आहे. दुसरीकडे शनीची साडेसाती धनु, मकर आणि मीन राशीत सुरू आहे.
धनु आणि मीन राशीचा स्वामी असल्यामुळे या दोन्ही राशींना प्रतिगामी स्थितीत आरोग्य आणि करिअरकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या दरम्यान या सर्व 6 राशींना घाईची परिस्थिती टाळावी लागेल. या काळात शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या.
ज्योतिष उपाय
शनीची अशुभता टाळण्यासाठी शनिवारी शनिशी संबंधित वस्तूंचे दान करा. आणि बृहस्पति म्हणजेच गुरूची अशुभता टाळण्यासाठी गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ




















