Shani-Rahu Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च 2025 रोजी शनी (Shani Dev) मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत राहु (Rahu) आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे या ठिकाणी शनी राहूची युती होणार आहे. 2025 मध्ये शनी राहूचा दुर्लभ संयोग काही राशींच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या राशींच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी 2025 चा काळ हा सर्वात शुभ काळ असण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला धन संपत्ती  आणि करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, शनी आणि राहूच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ मिळेल. या काळात तुम्ही चांगली गुंतवणूक करु शकता. तसेच, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी शनी-राहूचा संयोग फार लाभदायक ठरणार आहे. शनी-राहूच्या संयोगाने तुमच्या जीवनात समृद्धी येईल. तसेच, यामुळे तुमचे स्वास्थ्यही निरोगी राहील.कामाच्या ठिकाणी प्रगतीसह प्रमोशनही मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसेच , या काळता तुमचा आत्मविश्वासही वाढलेला दिसेल. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी शनी-राहूचा संयोग शुभ संकेत देणारा आहे. या काळात तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमच्या कुटुंबात देखील आनंदी वातावरण पाहायला मिळेल. राहूच्या प्रभावाने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                                                                                                                     


Astrology : आज विनायक चतुर्थीच्या दिवशी कला योगासह जुळून आले शुभ संयोग; धनुसह 'या' 5 राशींवर असणार बाप्पाचा आशीर्वाद