Astrology Panchang 03 January 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज विनायक चतुर्थीचा (Vinayak Chaturthi) दिवस आहे. तसेच, पौष महिन्याच्या शु्क्ल पक्षाची चतुर्थी तिथी आहे. तसेच, आज कला योगसह रवि योग (Yog) आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींवर होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मंगलमय असणार आहे.आज तुम्ही हाती घेतलेल्या कामाला तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुम्ही जास्त मग्न व्हाल. गणपतीचा तुमच्यावर आशीर्वाद असल्या कारणाने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे मोकळे होतील. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ लाभदायक असेल.  


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज तुमचं मन धार्मिक कार्यात जास्त रमेल. तसेच, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर धार्मिक यात्रेला जाऊ शकाल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. वैवाहिक जीवन आनंदीस सुरु राहील. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आज तुमच्या मनातील एखादी इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


धनु रास (Sagittarius Horoscope) 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. तसेच, कौटुंबिक परिस्थिती चांगली असून तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाचया ठिकाणी सहकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसून येईल. तसेच, तुमचं आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. राजकारणात तुमचा रस वाढलेला दिसून येईल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा असणार आहे. अभ्यासात नवीन गोष्टी शिकता येतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Vinayak Chaturthi : 2025 वर्षातील आज पहिली विनायक चतुर्थी; जाणून घ्या अचूक तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी