Shani 2024 : ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांपैकी शनि (Shani) हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनीला अडीच वर्षं लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिला न्याय देवता आणि कर्माचे फळ देणारा म्हणून देखील ओळखले जाते. शनीने 2023 च्या सुरुवातीला कुंभ राशीत प्रवेश केला असून अजूनही तो कुंभ राशीतच वास्तव्य करत आहे.
2024 मध्ये शनि रास बदलणार नसला तरी शनीच्या नक्षत्रात बदल दिसून येईल. शनि सध्या शतभिषा नक्षत्रात स्थित असून यानंतर तो पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. यानंतर 3 ऑक्टोबरला शनि भाद्रपद नक्षत्रातून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. शनीच्या या हालचालींचा परिणाम संपूर्ण 12 राशींवर होईल. परंतु अशा 4 राशी आहेत, ज्यांच्यावर शनि धनाचा वर्षाव करेल. या राशींबद्दल जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा नक्षत्र बदल फायदेशीर ठरणार आहे. या नक्षत्रात शनीचे मार्गक्रमण अतिशय शुभ असणार आहे. या काळात त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. मेष राशीच्या लोकांना वाहन, जमीन इत्यादी भौतिक सुख मिळेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांची प्रगती होईल. त्याच वेळी, मन आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहील.
वृषभ रास (Taurus)
भाद्रपद नक्षत्रात शनीचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील शुभ परिणाम घेऊन येईल. यावेळी या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. तसेच घरात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनि शुभ फल देणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी भाद्रपद नक्षत्रात शनीचे संक्रमण विशेष राहील. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक जीवनात अपेक्षित यश मिळेल. एवढेच नाही तर, आर्थिक बाबीही यावेळी सुधारतील. कुटुंबात सुख-शांती राहील, व्यवसायात लाभ होईल आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ चांगला असणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. अविवाहितांना लग्नाची स्थळं येऊ शकतात. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. त्याचबरोबर बेरोजगारांनाही नवीन नोकऱ्या मिळू शकतात. या काळात शनिदेवाच्या कृपेने सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani 2024: नवीन वर्षात 'या' राशींना जाणवणार शनीचा त्रास; समस्या वाढणार