Shani 2024 : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला (Shani Dev) खूप महत्त्व आहे. शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनिच्या स्थितीचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. न्यायाची देवता शनि 2024 मध्ये 3 वेळा आपली स्थिती बदलणार आहे. काही राशींसाठी हा बदल सकारात्मक असेल, तर काहींवर याचा नकारात्मक परिणाम असेल. ज्या राशीच्या लोकांना या वर्षी शनिदेव त्रास देऊ शकतात त्यांनी ज्योतिषीय उपायांचा अवलंब करावा, जेणेकरून शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल.


यावर्षी प्रथम 11 फेब्रुवारी 2024 रोजी शनीचा कुंभ राशीत अस्त होईल. यानंतर 18 मार्च रोजी शनि त्याच राशीत पुन्हा प्रकट होईल, त्यानंतर 29 जून 2024 रोजी शनि पूर्वगामी होऊन, म्हणजेच उलटी चाल चालून सर्व राशींवर त्याचा परिणाम दाखवण्यास सुरुवात करेल. कोणत्या 3 राशींना शनि 2024 मध्ये त्रास देईल? आणि हा शनीची पिडा कमी करण्याचे उपाय कोणते? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


2024 या वर्षात शनीचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर दिसून येईल. मेष राशीच्या व्यापारी आणि व्यावसायिकांना 2024 मध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक समस्यांसोबतच तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. या वर्षी दान करत राहा, शनिदेवाच्या नावाने काळ्या वस्तू दान करा, यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.


मिथुन रास (Gemini)


शनिमुळे तुम्हाला या वर्षात अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. खरं तर हे वर्ष परीक्षेसारखे असेल, ज्यामध्ये तुमची मेहनत आणि संयम या दोन्हींची परीक्षा होईल. उत्पन्नाशी संबंधित आणि आरोग्याशी संबंधित काही समस्यांसाठी तयार राहा. शनीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी प्रत्येक शनिवारी मोहरीचे तेल दान करा आणि शनि मंदिरात दर्शन घ्या.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या मागेही या वर्षी शनीची पिडा असेल. केवळ उत्पन्नावरच नाही, तर कौटुंबिक सुखावरही शनि नकारात्मक प्रभाव पडेल. अशा परिस्थितीत कुटुंब आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्या. आरोग्यासंबंधित मोठ्या समस्या उद्भवू शकतात. आरोग्याबाबत बेफिकीर न राहता दर शनिवारी शनि मंत्राचा जप करून दान करा, गरिबांना दान करा.


2024 मध्ये या 3 राशींवर शनीची कृपा


नवीन वर्षात काही राशींवर शनिदेवाची कृपा राहील. या राशी कुंभ, सिंह आणि वृषभ आहेत. शनिदेवाच्या कृपेने या तीन राशीच्या लोकांना मान-सन्मान, प्रतिष्ठा, उत्पन्न वाढेल आणि नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमचे कुटुंबाशी असलेले नाते अधिक घट्ट होईल आणि वर्षभर मानसिक शांति मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani 2024 : तीन महिन्यांनंतर शनिदेव नक्षत्र बदलणार; 'या' 4 राशींना होणार मोठा फायदा