Shani Margi 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी 15 नोव्हेंबरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. या दिवशी शनी (Shani Dev) कुंभ राशीत सरळ चाल चालणार आहे. तर 30 जूनपासून वक्री अवस्थेत आहे. शनीच्या (Lord Shani) मार्गी झाल्याने काही राशींचं टेन्शन वाढू शकतं. कारण या राशींवर साडेसाती किंवा ढैय्याचा प्रभाव होऊ शकतो. या व्यतिरिक्त शनीच्या अशुभ प्रभावामुळे या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. शनीच्या मार्गी होण्याने कोणत्या 4 राशींवर नकारात्मक परिणाम होईल ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
कुंभ राशीत शनीच्या मार्गी अवस्थेमुळे तूळ राशीच्या जीवनावर अशुभ परिणाम होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुमच्या व्यवसायात सावधानता बाळगण्याची गरज आहे. या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तसेच, तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर राहा. तसेच, कोणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शनीच्या मार्गीमुळे धनु राशीच्या लोकांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबरपासून तुमच्या धनसंपत्तीत कमतरता भासू शकते. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घ्या. तसेच, या काळात धनु राशीच्या लोकांना महत्त्वाचा सल्ला देण्यात येत आहे की, कोणावरही डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका. तसेच, जर तुम्हाला मानसिक तणाव जाणवत असेल तर त्यासाठी योग, ध्यान आणि व्यायाम करायला सुरुवात करा.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांवरदेखील शनीच्या मार्गीचा प्रभाव होणार आहे. या काळात तुम्हाला अधिक मेहनत करण्याची गरज आहे. तसेच. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची गरज आहे. तुमचं एखादं महत्त्वाचं काम बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना नीट विचार करा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांना या काळात पैशांची कमतरता भासू शकते. तसेच, अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो. तुम्हाला पैसे कमी वापरण्याचा सल्ला दिला जातोय. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही योग्य काळजी घ्यावी. महिलांना सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: