Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रह (Sun) जवळपास एक महिन्यानंतर राशी परिवर्तन करतात. सध्या सूर्य धनु राशीत संक्रमण करतायत. तर, 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. वृश्चिक राशीत मंगळ देव विराजमान आहे. मंगळ हा सूर्यदेवाचा मित्र आहे. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाने (Surya Gochar) काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमच्या धन-संपत्तीत देखील वाढ होऊ शकते. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण लाभदायक ठरु शकतं. या दरम्यान तुम्हाला वेळोवेळी धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात कोणताही निर्णय घेताना विचार करुनच घ्या. व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात मात्र तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसेल. लोक तुमच्यावर प्रभावित होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
सूर्याचं राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी शुभकारक असण्याची शक्यता आहे. या राशीच्या पंचम भावात सूर्य संक्रमण करणार आहे. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या मुलांप्रती एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना आपल्या मनासारखी नोकरी करता येईल. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचं आरोग्य देखील चांगलं असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण फार अनुकूल ठरणार आहे. कारण या राशीच्या चतुर्थ चरणात सूर्य संक्रमण करणार आहे. त्यामुळे तुमच्या सुख-संपत्तीत चांगली वाढ होऊ शकते. जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमच्या नोकरीत स्थिरता वाढेल. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: