(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Gochar 2024 : तब्बल दीड वर्षानंतर शनीचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं फुटकं नशीब उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Shani 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत शनि बलवान असेल तर त्या व्यक्तीला कार्यक्षेत्रात विशेष यश मिळतं. शनिदेवाच्या कृपेने व्यक्ती अल्पावधीतच धनवान बनते. तर दुसरीकडे शनीच्या वाईट दृष्टीमुळे व्यक्तीला विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
Shani Rashi Parivartan 2025 In Meen : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani) सर्व ग्रहांमध्ये सर्वात क्रूर ग्रह समजलं जातं. शनि (Shani) सर्वात संथ गतीने वाटचाल करणारा ग्रह आहे, तो एका राशीत अडीच वर्ष राहतो. त्यामुळे त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर दिर्घकाळ राहतो. सध्या शनि आपल्या मूळ राशीत, म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. यानंतर 2025 मध्ये शनीचं राशी परिवर्तन होईल आणि तो मीन राशीत प्रवेश करेल.
शनि 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीच्या लोकांवर असलेली साडेसाती संपेल आणि मेष राशीवर साडेसाती सुरु होईल. शनीच्या राशी परिवर्तनामुळे 3 राशींचं निद्रीस्त भाग्य जागृत होईल आणि या राशींना सोन्याचे दिवस येतील. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
शनीने मीन राशीत प्रवेश करताच वृषभ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल. या राशीच्या लोकांच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणी दूर होतील. या सोबत नवीन वर्षी तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामं देखील पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात तुम्हाला अभूतपूर्ण यश मिळेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांना 2025 मध्ये जास्तीत जास्त फायदा होईल. राशी बदलादरम्यान, तूळ राशीच्या लोकांच्या सहाव्या घरात शनिदेव उपस्थित राहतील. या घरामध्ये शनिदेवाच्या संक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांना शत्रूपासून मुक्ती मिळेल. यासोबतच तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळेल. या काळात तूळ राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असेल. त्याच्या कृपेने तुमच्या आर्थिक समस्याही दूर होतील. कर्जापासून मुक्ती मिळेल. प्रत्येक सोमवार आणि शनिवारी पाण्यात काळे तेल मिसळून शंकराला अभिषेक करावा. यामुळे सर्व प्रकारचे दु:ख, संकटं दूर होतील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि देवता भगवान शंकर आहे. या राशीच्या लोकांना भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो. त्याच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना जीवनात सर्व प्रकारचं सुख प्राप्त होतं. शनिदेवाच्या राशी बदलामुळे मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. सध्या मकर राशीच्या लोकांचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. यानंतर मकर राशीची आर्थिक प्रगती होईल. व्यवसाय वाढीस लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :