Shani Dev : शनीच्या वक्री चालीत चुकूनही 'ही' 3 कामे करु नका; पुढच्या काळात 'या' राशींवर असणार शनीची करडी नजर
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या वक्री स्थितीत शनीच्या नजरेत पाप ठरतील अशी कामे चुकूनही करु नयेत. कारण, जर तुम्ही कोणतीही चुकीची कामे केलीत तर शनीदेव क्रोधित होऊ शकतात.
Shani Dev : आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, कर्मफळदाता शनी (Shani Dev) जेव्हा क्रोधित होतात तेव्हा त्यांचा राग शांत करणं फार कठीण आहे. असं म्हणतात की, ज्या राशीच्या लोकांवर शनीची (Lord Shani) क्रूर दृष्टी पडते त्यांच्या आयुष्यात दारिद्र्य देखील यायला वेळ लागत नाही. सध्या ऑगस्ट महिना सुरु आहे. या महिन्यात शनीच्या उलट्या चालीमुळे शनीची नजर आणखीनच क्रूर झाली आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात शनीच्या नजरेत पाप ठरतील अशी कामे चुकूनही करु नयेत. कारण, जर तुम्ही कोणतीही चुकीची कामे केलीत तर शनीदेव क्रोधित होऊ शकतात. खरंतर, शनीच्या वक्री स्थितीत ज्या लोाकांवर शनीचा प्रभाव आहे अशा लोकांसाठी हा काळ फार कष्टायचा असतो. या काळात जी व्यक्ती शनीच्या न्यायाविरुद्ध काम करतात त्यांना शनीची पीडा सहन करावी लागते.
शनीदेव क्रोधित होऊ नये यासाठी चुकूनही 'ही' कामे करु नका
संपत्तीची हाव करु नका
शनीच्या नजरेत संपत्तीची हाव आणि लालच एक मोठं पाप आहे. शनीला कर्मफळदाता म्हणून ओळखतात यासाठीच जी व्यक्ती मेहनत करुन पैसे कमवत असेल तर अशी व्यक्ती शनीच्या नजरेत श्रेष्ठ व्यक्ती आहे. जे लोक मेहनत न करता वाईट मार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असतील किंवा लोकांच्या संपत्तीवर नजर ठेवत असतील अशा लोकांना शनी शिक्षा देतात.
दुसऱ्यांचा अपमान
जे लोक आई-वडिलांचा किवा गरीब व्यक्तीचा किंवा आपल्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असतील तर अशा व्यक्तीवर शनीची वक्री दृष्टी असते. शनी अशा लोकांना कधीच माफ करत नाहीत. शनीच्या दशेत अशा लोकांचं जीवन फार कष्टकारक असतं.
धोकादायक
शनीला खरे लोक, खरे मित्र आणि दुसऱ्यांना मदत करणारे लोक फार प्रिय असतात. पण जे लोक मैत्रीत धोका देतात अशा लोकांना शनीचा क्रोध सहन करावा लागतो. शनी धोका देणाऱ्या लोकांना कधीच माफ करत नाही.
या राशीच्या लोकांवर शनीची करडी नजर
मेष रास (Aries Horoscope)
शनी ऑगस्टपासून 15 नोव्हेंबरपर्यंत 2024 वक्री स्थितीत आहे. या दरम्यान शनी उल्टी चाल चालणार आहेत. या दरम्यान या राशीच्या लोकांना करिअरपासून नोकरीपर्यंत प्रत्येक कामात संकटांचा सामना करावा लागू शकतो.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु आहे. सध्या शनीची वक्री सुरु आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात कोणत्याही गरीब व्यक्तीला त्रास देऊ नका. तसेच, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :