Shani Dev: हिंदू धर्मग्रंथानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव ज्याला न्यायाची देवता म्हणतात. आठवड्यातील एक दिवस म्हणजे शनिवार हा शनिदेवाला समर्पित असतो. या दिवशी शनिदेवाचे भक्त त्यांच्या जवळच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करतात. असे मानले जाते की शनिदेव प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ देतात. त्यामुळेच भक्तांकडून त्यांना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे ठरते. शनिवारी मंदिरांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. या दिवशी सर्व भक्त त्यांची पूजा करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यास सांगतात.


जर शनिदेव तुमच्यावर कोपले असतील तर..


असे मानले जाते की जर शनिदेव तुमच्यावर कोपले असतील तर तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच शनिदेवाला नेहमी प्रसन्न ठेवावे असे म्हटले जाते. त्याची कृपा भक्तावर राहिली तर भक्त सदैव आनंदी राहतो. आज आपण असा एक उपाय सांगणार आहोत, जो केल्याने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील.


काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने खरंच मिळेल साडेसातीपासून मुक्तता?


धार्मिक मान्यता तसेच शास्त्रानुसार शनिदेवाची पूजा केल्यानंतर तुम्ही काळ्या कुत्र्याला मिठाई आणि भाकरी खाऊ घालू शकता. हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे मानले जाते की काळ्या कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घातल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, जर कोणाच्या जीवनात अनेक समस्या असतील तर तो कुत्र्याला भाकरी खाऊ घालून आपण शनिदेवाला प्रसन्न करू शकतो. अशी मान्यता आहेय 


अत्यंत शुभ उपाय, फार कमी लोकांना माहीत...


हिंदू शास्त्रानुसार शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. शनिदेवाची कृपा शनिवारी होते. या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यास शनिदेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार घरात कुत्र्यांचे अस्तित्व नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यापासून रोखते. असे मानले जाते की काळा कुत्रा घर आणि कुटुंबातील सदस्यांना वाईट नजरेपासून वाचवतो.



  • ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या कुत्र्यांवर शनि आणि केतू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. 

  • त्यामुळे शनि आणि केतू दोन्ही शांत मानले जातात. 

  • जर तुम्हाला तुमच्या घराबाहेर किंवा रस्त्यावर कुत्रे दिसले तर त्यांची सेवा करा, 

  • त्यांची काळजी घ्या आणि त्यांना खायला द्या. 

  • असे मानले जाते की कुत्र्याची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात

  • ते भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. 

  • या सर्व कृती केल्याने शनीची ढैय्या, कुंडलीतील शनि दोष आणि शनीची साडेसातीही नाहीशी होते. 

  • यासोबतच कुत्र्यांना मोहरीच्या तेलाने लेप केलेली भाकरी खायला द्यावी, 

  • कारण यामुळे कालभैरव प्रसन्न होतात आणि जीवनात आनंद मिळतो. 


हेही वाचा>>>


Astrology: एप्रिल महिना 'या' 3 राशींचं भाग्य घेऊन येतोय! शनीच्या नक्षत्रात मंगळाची एंट्री होणार, बक्कळ पैसा, राजासारखं जीवन जगणार! ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


ब्रेकिंग तसेच ताज्या बातम्यांसाठी पाहा...