Maharashtra Weather Update:राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमान 35 ते 38 अंशांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्यासह उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात चढ उतार जाणवला. मध्य महाराष्ट्रात पहाटे काहीसा गारवा आणि दुपारी कडक ऊन असाच कल राहिला.नंदुरबारमध्ये कमाल तापमानाने 40 अंश काल (14 फेब्रुवारी) ओलांडले. पुण्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 35-38 अंशांपर्यंत गेला.साताऱ्यात कराडमध्ये तापमान 40 अंश झाले होते. बहुतांश ठिकाणी साधारण कमाल तापमान असेच होते. (Temperature Alert)
राज्यात कसे राहणार तापमान?
महाराष्ट्रातील हवामान सध्या कोरडे असून, तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला दिसतो. राज्यातील बहुतांश भागांत उन्हाची तीव्रता वाढली असून, आकाश निरभ्र राहिल्यामुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कमाल तापमान 35°C पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. पुण्यातील INS शिवाजी लोणावळा येथे सर्वाधिक 41.4°C तापमानाची नोंद झाली आहे, तर गोंदियामध्ये गोंदियात येथे सर्वात कमी 10.6°C तापमान नोंदवले गेले आहे. मुंबईतही उन्हाचा जोर जाणवत असून, सांताक्रूझ येथे कमाल तापमान 35.7°C आणि किमान तापमान 21.2°C नोंदले गेले आहे. पुढील काही दिवसांतही राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाच्या तीव्रतेत आणखी वाढ होऊ शकते. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने तापमानवाढ जाणवते.सध्या राज्यात कुठेही पावसाचाी शक्यता नाही. (IMD Weather Update)
दरम्यान, हवामान विभागाचे पुणे विभाग प्रमुख के. एस होसाळीकर यांनी मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा अधिक असल्याचे सांगितले. त्यांनी X माध्यमावरही त्यांनी पोस्ट करत कुठे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली हे सांगितले आहे.
कुठे कसे तापमान?
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात येत्या चार दिवसांत आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सियसपर्यंत आणि किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवले आहे.
हवामान खात्याच्या नोंदींनुसार, राज्यातील बहुतांश ठिकाणी आर्द्रतेच्या प्रमाणात मोठी तफावत दिसते. कोकणातील काही भागांत आर्द्रता 80% ते 100% पर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे उष्णता अधिक जाणवतेय. तर लातूर, नाशिकसारख्या काही भागांत आर्द्रतेचे प्रमाण अगदी कमी म्हणजेच 1% इतके होते. त्यामुळे या भागांतील हवामान कोरडे आणि उष्ण जाणवत आहे.
हेही वाचा: