Allu Arjun Pushpa 2 Reloaded Version Trending: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) हा 2024 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट (Blockbuster Movie) आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि त्यानं भरघोस कमाई देखील केली. तसेच, या चित्रपटानं अनेकांचे रेकॉर्ड मोडलेत. 'पुष्पा 2'नं जगभरात 1800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. थिएटर गाजवल्यानंतर आता पुष्पाभाऊ ओटीटीदेखील गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट ओटीटीवरही ग्लोबली ट्रेंड करत आहे.
'पुष्पा 2' च्या रीलोडेड व्हर्जननं नेटफ्लिक्सच्या (Netflix Top 10 Tranding) जागतिक टॉप 10 नॉन-इंग्रजी चित्रपटांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. हा चित्रपट सध्या जगभरात नेटफ्लिक्सवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, तो 13 देशांमध्ये ट्रेंड करत आहे. हा चित्रपट फक्त दोन आठवड्यात जगभरात 9.4 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. हा चित्रपट ओटीटीवर हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी भाषेत देखील उपलब्ध आहे.
अल्लू अर्जुनकडून चाहत्यांचे आभार
'पुष्पा 2' चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, चित्रपटात रश्मिका मंदाना, फहाद फासिल, सुनील, जगपती बाबू, राव रमेश आणि अनुसूया भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन म्हणतो की 'पुष्पा 2' ला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे तो खूप आनंदी आहे. हा चित्रपट खूप डेडिकेशन आणि पॅशननं बनवण्यात आला आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल अल्लू अर्जुननं चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'पुष्पा 2'च्या यशामुळे दिग्दर्शकही समाधानी
'पुष्पा 2' ला मिळत असलेल्या प्रेमामुळे दिग्दर्शक सुकुमार देखील खूप खूश असल्याचं दिसून आलं. तो म्हणाले की 'पुष्पा द राईज' नं एक वेगळं जग आणि रंगमंच निर्माण केला आहे, जो लोकांना खूप आवडला. आता या चित्रपटाला इतकं प्रेम मिळत आहे, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. 'पुष्पा 2' 30 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :