Shani Dev : 2025 मध्ये कुंभ राशीवर असणार शनीची साडेसाती? जाणून घ्या कोणतं फळ मिळणार
Shani Dev : सध्या शनीच्या कुंभ राशीत साडेसातीचा दुसरा चरण सुरु आहे. तर, तिसरा चरण लवकरच सुरु होणार आहे.
Shani Dev : ज्योतिष शास्त्राप्रमाणे, प्रत्येक राशीवर कधीना कधी शनीची (Lord Shani) साडेसाती सुरु होते. शनीला ग्रहांचा न्यायाधीश असं म्हटलं जातं. म्हणजेच शनी (Shani Dev) व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार चांगले-वाईट फळ देतो. तसेच, शनीच्या चालीमुळे होणारा परिणाम हा हळूहळू होणारा असतो. याचं कारण म्हणजे शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह आहे. शनीच्या साडेसातीचा प्रभाव साडे सात वर्षांपर्यंत असतो.
सध्या शनीच्या कुंभ राशीत साडेसातीचा दुसरा चरण सुरु आहे. तर, तिसरा चरण लवकरच सुरु होणार आहे.
कुंभ राशीवर शनीची मेहरबानी
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनी हा कुंभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर शनीची नेहमी कृपा राहते. त्यामुळे शनी या राशीच्या लोकांना त्रास देत नाही. तर, या राशीच्या लोकांना शनी संघर्ष करायला लावतो. धार्मिक कार्यात गुंतवतो. त्यानंतर या राशीच्या लोकांना शनी लाभ देतो.
कुंभ राशीच्या लोकांवर जानेवारी 2020 पासून शनीची साडेसाती सुरु आहे. तर, 29 मार्च 2025 साडेसातीचा दुसरा चरण संपणार आहे. तर, तिसरा चरण 2027 पर्यंत असणार आहे.
2025 मध्ये शनी कुंभ राशीला कोणतं फळ देणार?
जर तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला त्याचा लाभच लाभ मिळेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप उंची गाठाल. पण, जर शनीची स्थिती तुमच्या राशीत ठीक नसेल तर तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. शनीचा प्रभाव आपल्या आयुष्यात अनेक वर्षांपर्यंत तसाच असतो. जर तुमची मागच्या जन्मीची कर्म चांगली असतील तर शनी तुम्हाला लाभ देईल.
कुंभ राशीत शनीची साडेसाती लवकरच संपणार आहे. 2027 पर्यंत तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल. तसेच, तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. त्यानंतर शनीचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 28 August 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य