Shani Dev : शनीची वक्री चाल! 'या' 3 राशींना पुढच्या 256 दिवसांत मिळणार कर्माचं फळ, शनी होणार प्रसन्न
Shani Dev : शनी सध्या कुंभ राशीत उदय स्थित आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत शनी याच अवस्थेत राहणार आहे.
Shani Dev : कर्मफळदाता आणि न्यायाची देवता असणारा शनी (Shani Dev) एका ठराविक कालावधीनंतर आपली चाल बदलतो. शनीला (Lord Shani) एका राशीतून पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. आपल्या सगळ्यांनाचा माहीत आहे की, प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार शुभ अशुभ परिणाम देतो. याचाच अर्थ असा होतो की, शनीची जर शुभ स्थिती असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो. पण, शनीचा जर अशुभ परिणाम असेल तर त्या राशीच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
शनी सध्या कुंभ राशीत उदय स्थित आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत शनी याच अवस्थेत राहणार आहे. शनी 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अस्त होणार आहे. तसेच, काही दिवसांनी शनीची वक्री सुद्धा होणार आहे. याचा काही राशींवर परिणाम होणार आहे. शनीची उदय अवस्था 2025 पर्यंत कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) शुभ असणार आहे ते जाणून घेऊयात.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शनीच्या कुंभ राशीत उदय अवस्थेने धनु राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. या काळात तुमची आर्थिक समस्या हळूहळू कमी होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. पम तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमची अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीची ही स्थिती फार चांगला परिणाम घेऊन येणार आहे. या दरम्यान तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. शनीच्या शुभ प्रभावाने तुम्हाला करिअरमध्ये प्रमोशन देखील मिळू शकते.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या वक्री चालीचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर देखील दिसून येणार आहे.वृषभ राशीच्या लोकांना याचा चांगला लाभ होणार आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या घरात सुख-शांतीचं वातावरण असेल. तसेच, तुमच्या मित्राच्या सहकार्याने तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :