Shani Dev : शनीच्या ढैय्यामुळे 'या' राशीवर सतत असणार टांगती तलवार; पदोपदी राहावं लागेल सावध
Shani Dev : शनीच्या या वक्री चालीमुळे कोणत्या राशीला संकटांचा सामना करावा लागणार आहे? ही रास नेमकी कोणती ते जाणून घेऊयात.

Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2025 मध्ये अनेक मोठ्या ग्रहांचं राशी तसेच नक्षत्र होणार आहे. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. या दरम्यान कर्मफळदाता शनीसुद्धा (Shani Dev) वक्री चाल चालणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना लाभ तर काही राशींच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागणार आहे. यावर्षी एका राशीवर (Zodiac Signs) शनीची साडेसाती आणि ढैय्या सुरु होणार आहे.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, कर्मफळदाता शनी जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. तेव्हा हा काळ अडीच वर्षांचा असतो. तर, संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी शनीला तीस वर्षांचा कालावधी लागतो. शनीच्या या वक्री चालीमुळे कोणत्या राशीला संकटांचा सामना करावा लागणार आहे? ही रास नेमकी कोणती ते जाणून घेऊयात.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शनी वक्री चालीच्या दरम्यान धनु राशीच्या लोकांना संकटाचा सामना करावा लागेल. या काळात तुम्हाला नोकरीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, या काळात तुमची आर्थिक स्थिती मध्यम राहील. तुम्हाला तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये समतोल ठेवण्याची गरज आहे.या काळात कोणत्याही नवीन वस्तूची खरेदी करु नका.
तसेच, विद्यार्थ्यांना देखील या काळात सावधान असण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा. तसेच, स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याची संधी गमावू नका. यातून तुम्हाला खूप काही शिकता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : आज शश राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग, मिथुनसह 'या' 5 राशींवर असणार शनिदेवाचा कृपा; मिळणार उत्तम संधी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
