Shani Dev : 2026 मध्येसुद्धा 'या' 3 राशींवर असणार साडेसातीचं वादळ; संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय
Shani Dev : 2026 मध्ये मेष, कुंभ आणि मीन राशींना संपूर्ण वर्षभर शनिची साडेसाती असणार आहे. त्यामुळे हा काळ काही राशींसाठी फार कष्टाचा असणार आहे.

Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, अवघ्या काही तासांनी मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2026) सणाला सुरुवात होणार आहे. या दिवशी सूर्य देव आपल्या पुत्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्य आणि शनिचा (Shani Dev) संयोग जुळून येणार आहे. हा काळ तीन राशींसाठी खास असणार आहे.
खरंतर, 2026 मध्ये मेष, कुंभ आणि मीन राशींना संपूर्ण वर्षभर शनिची साडेसाती असणार आहे. त्यामुळे हा काळ काही राशींसाठी फार कष्टाचा असणार आहे. तर, या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
2026 मध्ये मेष राशीच्या लोकांवर शनिची साडेसातीचा पहिला टप्पा सुरु असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला करिअरमध्ये आणि व्यवसायात अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच, अनेक आव्हानं तुमच्यासमोर येतील. नात्यांमध्ये गैरसमजुतीमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो.
उपाय - शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलामध्ये काळे तीळ मिसळून एक दिवा शनि देवाच्या समोर लावावा. तसेच, शनिच्या मंत्राचा जप करावा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु राहील. तसेच, या राशीत राहूसुद्धा आहे. त्यामुळे या काळात तुमच्या आयुष्यात अनेक आर्थिक संकटं येतील. अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागेल. तसेच, तुम्हाला दिर्घकालीन आजाराचा देखील सामना करावा लागू शकतो.
उपाय - मकर संक्रांतीला मोहरीचं तेल दान करा. तसेच, गरजू व्यक्तींना दान करा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. तुमच्या धनसंपत्तीत अनेक अडथळे येऊ शकतात. तुमच्या नातेसंबंधांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच, आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
उपाय - मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पाण्यात काळे तीळ घालून स्नान करा. तसेच, सूर्यदेवाला जल अर्पण करा.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















