एक्स्प्लोर

Shani Dev: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु राशींची 2032 पर्यंत खरी कसोटी! सध्या शनि साडेसाती, ढैय्या सुरू, 'या' काळात कोणत्या गोष्टी कराल? कोणत्या टाळाल?

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु राशींची सध्या शनि परीक्षा सुरू आहे; या काळात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या.

Shani Dev: शनि... फक्त या नावाचा उल्लेख जरी झाला तरी भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना मोठे महत्त्व आहे, त्यांना कर्मफलदाता आणि न्यायदेवता असेही म्हटले जाते.  ज्योतिषींच्या मते, शनि ग्रह हा शिस्त, संघर्ष, न्याय आणि कर्माचा ग्रह आहे. शनि चांगल्या कर्मांवर चांगले फळ देतो, तर वाईट कर्मांवर वाईट फळ मिळते. जाणून घेऊया सध्या कोणत्या राशींवर शनिच्या साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव आहे? आणि तो कसा टाळावा?

शनि साडेसाती...ढैय्या...सध्या 'या' राशींची शनि परीक्षा...(Shani Sade Sati 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहांपैकी, शनि हा सर्वात मंद गतीने फिरणारा ग्रह मानला जातो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि नंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. नऊ ग्रहांपैकी, केवळ शनिमध्येच साडेसाती आणि ढैय्या लादण्याची शक्ती आहे. शनि साडेसातीचा केवळ उल्लेखही लोकांच्या मनात भीती निर्माण करतो. शनि सध्या मीन राशीत आहे. त्यामुळे, मीन, कुंभ आणि मेष राशीतील व्यक्तींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. शनिच्या ढैय्याबद्दल बोलायचे झाल्यास, सिंह आणि धनु राशीतील व्यक्तींवर त्याचा प्रभाव आहे.

शनि साडेसाती आणि ढैय्या कधीपर्यंत?

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि सध्या मीन राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे साडेसाती आणि ढैय्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:

शनि साडेसाती

कुंभ

साडेसातीचा शेवटचा टप्पा
करिअर, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत संयम आवश्यक.
समाप्ती: साधारणपणे जून 2027 मध्ये.

मीन

साडेसातीचा दुसरा (मध्य) टप्पा
हा साडेसातीतील सर्वात प्रभावी टप्पा मानला जातो.
जबाबदाऱ्या, मानसिक ताण आणि मोठे निर्णय यांचा काळ.
समाप्ती: अंदाजे 2032 पर्यंत.

मेष

साडेसातीचा पहिला टप्पा
खर्च, स्थलांतर, नोकरीतील बदल आणि नवीन जबाबदाऱ्या वाढू शकतात.
समाप्ती: अंदाजे 2034 पर्यंत.

शनि ढैय्या असलेल्या राशी

सिंह

सिंह राशीवर शनि ढैय्या सुरू आहे.
अचानक खर्च, आरोग्याची काळजी, कामांमध्ये विलंब जाणवू शकतो.
महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
कालावधी: शनि मीन राशीत असेपर्यंत, म्हणजे साधारण जून 2027 पर्यंत.

धनु

धनु राशीवरही शनि ढैय्याचा प्रभाव आहे.
घर, मालमत्ता, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
करिअरमध्ये मेहनत अधिक घ्यावी लागू शकते.
कालावधी: साधारण जून 2027 पर्यंत.

शनि प्रकोप कमी कसा कराल? साडेसाती आणि ढैय्या काळात काय करावे?

ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा न्याय आणि जबाबदारीचा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती शनिच्या साडेसाती किंवा ढैय्याच्या प्रभावाखाली असते, तेव्हा गरजू लोकांना मदत करणे शुभ मानले जाते. गरजूंना मदत करावी, मजूर आणि गरिबांना काहीतरी द्यावे आणि त्यांचा आदर करावा. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी मोहरीचे तेल, काळे कपडे आणि लोखंडी वस्तू दान करणे शुभ मानले जाते. याव्यतिरिक्त, शनिच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करणे अत्यंत फायदेशीर आणि शुभ मानले जाते. यामुळे मनातील नकारात्मकता दूर होते.

सेवक आणि कष्टाचा ग्रह...

ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा सेवक आणि कष्टाचा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जे लोक वेळोवेळी गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतात आणि त्यांच्याशी चांगले वागतात, त्यांना शनिदेवाचा नेहमी आशीर्वाद लाभतो.

हेही वाचा

June 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जूनचे शेवटचे 15 दिवस गेमचेंजर! 5 राशींवर कुबेराची कृपा, पैसा नोकरी, प्रेम.. राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget