Shani Dev : 2026 मध्ये शनिची साडेसाती असणाऱ्यांसाठी खुशखबर; जानेवारी महिना संपण्याआधीच 'या' राशींना होणार धनलाभ
Shani Dev : मकर राशीत बुध-सूर्याच्या युतीने बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. तर, शुभ-बुधाच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग तसेच, सूर्य-शुक्राच्या युतीने शुक्रादित्य राजयोग जुळून येणार आहे.

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 मध्ये तीन राशींच्या लोकांवर शनिची (Shani Dev) साडेसाती सुरु आहे. सध्या मेष, कुंभ आणि मीन राशीवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव आहे. सध्या मकर राशीत चार ग्रहांच्या समावेशाने पाच मोठे राजयोग जुळून येणार आहेत. मकर राशीत बुध-सूर्याच्या युतीने बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. तर, शुभ-बुधाच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग तसेच, सूर्य-शुक्राच्या युतीने शुक्रादित्य राजयोग (Rajyog) जुळून येणार आहे.
या व्यतिरिक्त रुचक राजयोग आणि मंगलादित्य राजयोगसुद्धा जुळून येणार आहे. य़ा सर्व राजयोगांचा साडेसाती असणाऱ्या राशींवर देखील शुभ परिणाम होताना दिसेल.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे या कालावधीत पाच मोठे राजयोग तुमच्या करिअरशी संबंधित अडचणी कमी करण्यासाठी मदत करु शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली असेल. तसेच, तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. राजयकीय तसेच, सामाजिक प्रतिष्ठा देखील मजबूत असेल. मुलांच्या कामात एकाग्रता दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. या राशीचा स्वामी ग्रह स्वत: शनिदेव आहे. पाच ग्रहांच्या युतीमुळे तुम्हाला आतापर्यंत ज्या ज्या अडचणींचा सामना करावा लागत होता. कष्ट करावे लागत होते ते अचानक दूर होतील. शनिच्या राशीत जुळून आलेल्या राजयोगामुळे तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा वाहन विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी हा काल चांगला असणार आहे. लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार आव्हानात्मक असू शकतो. पाच मोठ्या राजयोगांमुळे तुम्हाला लवकरच आर्थिक लाभदेखील मिळू शकतो. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल, घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















