Shani 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) विशेष महत्त्व आहे. शनीच्या चालीचा परिणाम हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. शनि शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीचं झोपलेलं भाग्य देखील उजळतं. यातच आता 12 मे रोजी शनीने आपली चाल बदलली आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब पालटणार आहे. शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश केला आहे, जिथे शनि 18 ऑगस्टपर्यंत राहील.
शनीच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. अशा परिस्थितीत शनीची बदलती चाल काही राशींना फार लाभदायी ठरू शकते. पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनीच्या प्रवेशामुळे 3 राशींचं भाग्य उजळेल. नेमका कोणत्या राशींवर शनीच्या चालीचा सकारात्मक परिणाम होईल ते जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं हे संक्रमण शुभ मानलं जातं. या काळात शनीच्या कृपेमुळे तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक करारांमध्ये तुम्हाला फायदा होईल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी थोडा बदल दिसून येईल, त्यांना याचा चांगला फायदा देखील होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. पैशाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होऊ लागतील. कुटुंबाची साथ तुमच्या पाठीशी राहील, तुम्हाला त्यांची चांगली मदत लाभेल.
वृश्चिक रास (Scorpio)
शनीची बदलती चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानली जाते. शनीच्या बदलत्या चालीमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या तुमच्या कामात तुम्हाला गती मिळेल. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. आईच्या आरोग्याशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर हा काळ व्यावसायिकांसाठी खूप शुभ मानला जातो. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना या काळात यश मिळेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना शनीच्या बदलत्या चालीचा फायदा होईल. कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेतील कोणतीही जुनी गुंतवणूक तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. त्याच वेळी, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: