Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनि (Shani) हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. न्याय देवता शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह देखील मानला जातो. या ग्रहाचा परिणाम व्यक्तीची संपत्ती, आरोग्य, प्रगती, व्यवसाय, नातेसंबंधांवर होतो. शनि हा एकमेव ग्रह आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीच्या मागे साडेसाती लागते, धैय्या लागते. अशा स्थितीत शनीच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात दिसून येतो.
शनि वेळोवेळी आपली राशी बदलतो, तसंच नक्षत्रही बदलतो. सध्या पूर्वाभाद्रपदाच्या प्रथम चरणात शनि स्थित आहे. 12 मे रोजी सकाळी 8:07 वाजता शनि पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. शनीचा हा टप्पा 18 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. शनि या चरणात असल्याचा विशेष लाभ काही राशीच्या लोकांना मिळू शकतो. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीने प्रवेश केल्यामुळे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. ऑगस्टपर्यंतच्या काळात या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ झालेली असेल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. प्रलंबित पैसे परत मिळतील. तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात तुमचा कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. समाजात मान-सन्मान मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. नोकरदार लोकांचा कामावर चांगला वेळ जाईल. यासोबतच सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कन्या रास (Virgo)
शनीच्या बदलत्या चालीमुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कामावर तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्हाला चांगली पगारवाढ मिळू शकते. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील तोटा या काळात भरुन निघेल. करिअर क्षेत्रातही फायदे होतील, जे लोक मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांना यश मिळू शकतं. कुटुंबात सुख-शांती नांदेल. प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील.
धनु रास (Sagittarius)
या राशीच्या लोकांवरही शनिदेवाची विशेष कृपा असेल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण करण्यासोबतच तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुम्ही कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी थोडा बदल दिसून येईल, त्यांना याचा फायदा देखील होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही अनेक संधी मिळू शकतात. यासोबतच तुम्हाला व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या कालावधीत ते करणं फायदेशीर ठरू शकतं. तुमची लव्ह लाईफ या काळात चांगली राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: