Sun Transit 2024 : सूर्याच्या वृषभ राशीतील मार्गक्रमणामुळे तब्बल 12 वर्षानंतर सूर्य आणि गुरुची युती होणार आहे. 14 मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल, गुरु या राशीत आधीच उपस्थित आहेत. सूर्य आणि गुरूच्या युतीमुळे गुरु-आदित्य योग तयार होणार आहे.  या शुभ योगामुळे 14 मे नंतर मेष आणि सिंह राशीसह 5 राशींच्या नशिबाचं टाळं उघडेल. या राशीच्या लोकांचं नशीब बदलेल आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठं यश मिळेल. या 5 भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


वृषभ राशीत तयार झालेला गुरु-आदित्य योग मेष राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळत तुम्ही चांगले पैसे कमवाल आणि ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं खूप कौतुक होईल. वरिष्ठांना तुम्ही तुमच्या कामाने प्रभावित करू शकाल. तुम्हाला समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळेल. तुम्ही व्यवसायात प्रचंड यश मिळवाल.  या दरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक गरजेची विशेष काळजी घेण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या जोडीदारासोबत उघडपणे मांडू शकाल.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे संक्रमण अतिशय शुभ ठरेल. करिअरच्या आघाडीवर तुम्हाला प्रचंड यश मिळेल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुमच्या जोडीदाराचे आणि तुमचे चांगले संबंध राहतील, तुमच्या दोघांमध्ये चांगला सुसंवाद निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत, तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील पूर्वीपेक्षा चांगली असेल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु-आदित्य योग अत्यंत शुभ मानला जातो. या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील. तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. दरम्यान, तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा योग तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणणारा मानला जातो. यावेळी तुमचा फिटनेस उत्तम असेल.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांना गुरु-आदित्य योग उत्कृष्ट परिणाम देईल. पैसे कमावण्यासोबतच तुम्हाला या काळात पैसे वाचवण्यातही यश मिळेल. नातेसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या आयुष्यात एक नवीन जोडीदार येऊ शकतो. सूर्याचं भ्रमण तुमच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग घेऊन येईल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या. नवीन गुंतवणुकीचा फायदा होईल. नवीन व्यवसायात यश मिळेल.


मीन रास (Pisces)


मीन राशीला 14 मेपासून व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही काही काळापूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला आता होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तुमच्या मुलाची कारकीर्द प्रगतीपथावर आहे, हे पाहून तुम्हाला खूप आनंद आणि समाधान वाटेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला मोठा लाभ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology :'या' जन्मतारखेच्या लोकांना प्रेम प्रकरणांत मिळत नाही यश; प्रेमाच्या बाबतीत असतात कमनशिबी, खरं प्रेम मिळणं तर अवघडच