Shani Asta 2025 : शनीच्या वाईट प्रकोपाला सर्वच जण घाबरतात. ज्योतिषशास्त्रामध्ये शनि हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीच्या चालीतील थोड्या बदलांमुळेही अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात चढ-उतार येऊ शकतात. शनि सर्वात हळू चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत जवळपास अडीच वर्ष विराजमान राहतो. या दरम्यान त्याचा अस्त आणि उदय सुद्धा होतो. शनि लवकरच कुंभ राशीत अस्त होणार आहे.
वैदिक पंचागानुसार, 28 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी शनि अस्त होणार आहे आणि 6 एप्रिलपर्यंत तो याच स्थितीत राहील. या दरम्यान शनीचं राशी परिवर्तन देखील होणार आहे. शनि अस्त झाल्याने काही राशींना लाभ मिळू शकतो तर काही राशींना या काळात सांभाळून राहण्याची गरज आहे. शनि अस्तामुळे नेमक्या कोणत्या राशींचं भाग्य उजळणार? जाणून घेऊया.
28 फेब्रुवारीपासून या राशींना सोन्याचे दिवस
वृषभ रास (Taurus)
या राशीच्या लोकांना शनिच्या अस्ताचा अफाट लाभ होऊ शकतो. या दिवसांत तुमची दीर्घकाळ अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच करिअरच्या क्षेत्रात खूप लाभ मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीसह पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायात नफा मिळू शकतो. वृषभ राशीच्या व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट किंवा डील मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती या काळात उत्तम राहील, तरी अति पैसे खर्च करू नये. लव्ह लाईफ चांगली असेल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या आठव्या आणि सातव्या भावामध्ये शनि अस्त होणार आहे. अशात या राशीच्या लोकांना नशीबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी या लोकांचं कौतुक होईल. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. व्यवसायात चांगला नफा होईल. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. तसेच हे लोक धन-संपत्ती वाचवण्यात यशस्वी होतील. या लोकांची लव्ह लाईफ उत्तम राहील आणि जोडीदाराचं सहकार्य लाभेल.
मीन रास (Pisces)
या राशीच्या लोकांसाठी शनिचा अस्त लाभाचा ठरेल. या राशीच्या बाराव्या आणि लग्न भावात शनि विराजमान राहणार आहे. अशात या राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होऊ शकतो. तुमची मानसिक तणावातून सुटका होईल. नोकरी-व्यवसायात या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. व्यवसाय क्षेत्रात तुम्ही प्रतिस्पर्धींना मोठी टक्कर देताना दिसून याल. तसेच या काळात पदोपदी धनलाभाचे योग जुळून येतील. धनसंपत्तीशी संबंधित अडचणी समाप्त होतील. लव्ह लाईफ उत्तम राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: