Shukra Yam Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो, जो राक्षसांचा गुरू असण्यासोबतच प्रेम-आकर्षण, संपत्ती, वैभव इत्यादींचाही कारक मानला जातो. शुक्राच्या स्थितीतील थोडासा बदलही 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो. त्यातच आता शुक्र आणि यम हे एकमेकांपासून 45 अंशांवर असतील. अशा स्थितीत अर्धकेंद्र योग जुळून येत आहे. पंचांगानुसार, 19 जानेवारीला दुपारी 12:02 वाजता शुक्र आणि यम अर्धकेंद्र योग तयार करतील, अशा स्थितीत 3 राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतं. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


शुक्र-यमाचा अर्धकेंद्र योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामांच्या पूर्ततेबरोबरच तुम्हाला थोरांचे आशीर्वादही लाभतील. तुम्हाला पैसे कमावण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही बरेच फायदे होतील. मुलांकडून आनंद मिळेल. यासोबतच विद्यार्थी चांगली प्रगती करतील.


सिंह रास (Leo)


या राशीच्या लोकांसाठी अर्ध केंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकतो. भगवान शुक्राच्या कृपेने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकता. भागीदारीत केलेल्या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी गुंतवणूकदार देखील शोधू शकता. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. यासोबतच लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुमचे व्यक्तिमत्व या काळात सुधारेल, ज्यामुळे तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष द्याल. मित्र मदतीला धावून येतील.


वृश्चिक रास (Scorpio)


शुक्र आणि यम यांनी तयार केलेला अर्धकेंद्र योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या घरात आनंदीआनंद येणार आहे. यासोबतच घरात कोणाचे ना कोणाचे सतत येणे-जाणे असेल. तुम्ही नवीन घर, वाहन खरेदी करू शकता किंवा घराचे नूतनीकरण करण्याचा विचार करू शकता. परदेशातून लाभ मिळू शकतो. नातेसंबंधांबद्दल बोलल्यास, आपल्या जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. यासोबतच व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. नोकरीत चांगले परिणाम मिळतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Mangal Yog 2025 : मंगळ बनवणार शक्तिशाली योग; 12 एप्रिलपासून उजळणार 3 राशीचं नशीब, पडणार पैशांचा पाऊस