September 2025 Astrology: अवघ्या 5 दिवसांत 'या' 3 राशींच्या आयुष्याचं होणार सोनं! तब्बल 4 ग्रह संक्रमण आणि सूर्यग्रहण, जिथे पाऊल ठेवतील तिथे पैसा असेल!
September 2025 Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात 5 दिवसांत 4 ग्रह संक्रमण करत आहेत, त्यानंतर सूर्यग्रहण देखील होत आहे. या सर्वांचा मोठा फायदा 3 राशीच्या लोकांना होणार आहे.

September 2025 Astrology: काही लोकांचे नशीब चमकले की ते मागे वळून पाहत नाहीत. कितीही संकटं असली तरी ते यशाची पायरी चढत राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यात अनेक महत्त्वाच्या ग्रहांचे संक्रमण होत आहेत, परंतु त्यात सप्टेंबरचा तिसरा आठवडा सर्वात खास आहे. या काळात 5 दिवसांत 4 ग्रह संक्रमण करत आहेत आणि त्यानंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सूर्यग्रहण देखील होत आहे. या सर्वांचा मोठा फायदा 3 राशीच्या लोकांना होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार त्या भाग्यशाली राशी कोणत्या असतील? जाणून घ्या...
2025 वर्षातील सप्टेंबर महिना खूप खास
ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षातील सप्टेंबर महिना खूप खास आहे. या महिन्यात सतत होणारे ग्रह संक्रमण अनेक लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल. या महिन्यात 5 दिवसांत 4 ग्रह संक्रमण होत आहेत. त्यानंतर 2025 सालचे शेवटचे सूर्यग्रहण देखील 21 सप्टेंबर रोजी होत आहे.
या 3 राशीं ठरणार भाग्यशाली...
ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार, 13 सप्टेंबर 2025 रोजी मंगळाने तूळ राशीत प्रवेश केला आहे. यानंतर 15 सप्टेंबर रोजी बुधाचे संक्रमण होत आहे. वाणी, बुद्धी आणि व्यवसायाचा कारक बुध कन्या राशीत भ्रमण करेल. त्याच दिवशी शुक्र सिंह राशीत भ्रमण करेल. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत भ्रमण करेल. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीत सूर्यग्रहण होत आहे. हे सर्व ग्रहांचे संक्रमण आणि सूर्यग्रहण सर्व 12 राशींवर परिणाम करतील. त्यापैकी 3 राशी अशा आहेत. ज्यांच्यासाठी हे ग्रहांचे संक्रमण खूप शुभ ठरतील.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी, ग्रहांच्या हालचालीतील हे बदल आणि सूर्यग्रहण करिअरमध्ये मोठी प्रगती करतील. आर्थिक लाभ होईल. अनेक उत्पन्नाचे मार्ग सापडतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांचे अपूर्ण काम पूर्ण होईल. नशीब त्यांच्या बाजूने असेल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आजार आणि तणाव दूर होतील. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे.
धनु
ज्योतिषशास्त्रानुसार, हा काळ धनु राशीच्या लोकांना करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या देऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नातेसंबंध सुधारतील. प्रगतीची प्रतीक्षा संपेल.
हेही वाचा :
Horoscope Today 15 September 2025: आजचा सोमवार 'या' 6 राशींचे नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने मिळतील मोठ्या संधी, 12 राशींचे राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















