Scorpio Weekly Horoscope 4th To 10th March : राशीभविष्यानुसार, 4 मार्च फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 हा आठवडा सावधानीचा आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? या काळात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...


वृश्चिक राशीचे करिअर  (Scorpio Career Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाचा असेल. व्यवसायात प्रगतीचा काळ असेल, तुम्ही व्यवसायात धोका पत्करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला अपार यशासाठी या आठवड्यात अधिक मेहनत करावी लागणार आहे. नोकरदारांचा हा आठवडा चांगला जाईल, पण तुम्ही नुकतंच नवीन ऑफिस जॉईन केलं असल्यास या आठवड्यात गोष्टी थोड्या बिघडू शकतात. 


वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope) 


आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही आकस्मिक लाभ मिळाल्याने आनंद होईल. आठवड्याच्या मध्यात आर्थिक लाभ होईल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला पैसे उधार देऊ शकता.


वृश्चिक राशीची कौटुंबिक स्थिती (Scorpio Family Horoscope)


वैवाहिक जीवनात संबंध सुधारतील. जोडीदाराशी जवळीक वाढेल. चांगल्या परस्पर ट्यूनिंगमुळे घरातील वातावरण देखील सकारात्मक असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल. मित्रांसोबत वीकेंडचा आनंद लुटता येईल. चालू आठवड्यात तुम्हाला मित्रांची मदत लाभेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही मित्रांसोबत चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. 


वृश्चिक राशीचे लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope) 


या आठवड्यात लव्ह लाईफमध्ये मतभेद होऊ शकतात, वाद झाल्यास योग्य निर्णय घ्या. तुमच्या आधीच्या प्रियकराशी तडजोड करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. विवाहित लोकांनी विवाहबाद्य संबंध टाळावे, कारण त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.


वृश्चिक राशीचे आरोग्य  (Scorpio Health Horoscope) 


या आठवड्यात तुमच्या आरोग्यात किरकोळ चढ-उतार दिसेल. जे लोक मद्याचं सेवन करतात त्यांना या आठवड्यात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. शक्यतो अल्कोहोल पिणं टाळा. ऑफिसचा दबाव घरी आणू नका आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Libra Weekly Horoscope 4 To 10 March 2024: तूळ राशीसाठी नवीन आठवडा फलदायी; गुंतवणुकीतून मिळेल चांगला नफा, जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य