Vijaya Ekadashi 2024 Date : हिंदू धर्मात एकादशी (Ekadashi) तिथीला खूप महत्त्व आहे. एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. पुराणात माघ महिना अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे. यात माघ कृष्ण पक्षात येणाऱ्या विजया एकादशी तिथीचं विशेष महत्त्व सांगितलं आहे.


माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशीचं व्रत (Vijaya Ekadashi 2024) केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. सुख-सौभाग्याच्या प्राप्तीसाठी विजया एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं. जी व्यक्ती हे व्रत भक्तीभावाने करते तिला मोक्ष प्राप्त होतो, असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. याच विजया एकादशी व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊया.


कधी आहे विजया एकादशी? (When Is Vijaya Ekadashi 2024?)


पंचांगानुसार, विजया एकादशी 6 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 7 मार्च रोजी पहाटे 4 वाजून 13 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 6 मार्चला विजया एकादशीचं व्रत केलं जाईल.


पूजा साहित्य


भगवान विष्णूच्या पूजेसाठी साहित्य - फळ, फूल, पंचामृत, धूप, दिवा, अगरबत्ती, तूप, कुंकू, अक्षता, नैवेद्य, मिठाई


पूजा विधी (Vijaya Ekadashi Puja Vidhi)



  • विजया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा.

  • सकाळी लवकर अंघोळ करुन चांगले कपडे परिधान करा.

  • सकाळी तुळशीला जल अर्पण करा.

  • यानंतर भगवान विष्णूंची आराधना करा.

  • शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवा.

  • भगवान विष्णूंसमोर दिवा लावा, धूप लावा.

  • तुळशीचं पान आणि पंचामृत अर्पण करा.

  • विष्णू मंत्राचा जप करा.

  • भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा करा.

  • देवाला फळ, फूल वाहा आणि अगरबत्ती लावा.

  • विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करा.

  • देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवा, त्यानंतर प्रसाद सर्वांना वाटा.


विजया एकादशी व्रताचे महत्त्व (Viaya Ekadashi Vrat Significance)


विजया एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते. भक्तांवर श्रीहरी-विष्णूंची कृपा कायम राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन-संपत्तीत वाढ होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला नक्की घ्या महादेवाचं दर्शन; शिवशंकराचे 12 ज्योतिर्लिंग नेमके कुठे? जाणून घ्या