(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Scorpio July Horoscope 2024 : वृश्चिक राशीसाठी नवीन महिना खर्चिक; गुरुमुळे होणार अचानक लाभ, वाचा जुलैचं मासिक राशीभविष्य
Scorpio July Horoscope 2024, Monthly Horoscope : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? तुमची आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती कशी असणार? जाणून घ्या
Scorpio July Horoscope 2024, Monthly Horoscope : वृश्चिक राशीचे लोक या महिन्यात त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी चांगलं नाव कमावतील. जुलै महिन्यात व्यवसायात तुमच्या नशिबाचे तारे चमकणार आहेत. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला अपेक्षित प्रगती आणि पदोन्नतीही मिळेल. हा महिना चांगला जाण्याची अपेक्षा आहे, कारण तुमच्या संपत्तीतही या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रशंसा, यश, सर्व काही मिळण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कसा असेल पहिला आठवडा? (Scorpio July Month Horoscope)
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आत्मसन्मान वाढेल. खर्च वाढल्याने अडचणी येतील. जुन्या वादावर तोडगा काढण्याचा मार्ग सापडेल. निर्णय घेण्यापूर्वी विचार करणं आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराच्या मूड स्विंगमुळे तुम्हाला त्रास होईल. संयमाच्या अभावामुळे प्रकरणं गुंतागुंतीची होतील. आकस्मिक धनलाभ संभवतो.
कसा असेल दुसरा आठवडा? (Scorpio July Month Horoscope)
दुसऱ्या आठवड्यात कुटुंबात आनंद राहील. निष्काळजीपणामुळे समस्या उद्भवू शकतात. ग्राहक स्नेह आणि क्षमा याद्वारे विजय प्राप्त होईल.प्रतिस्पर्ध्यांकडून तुम्हाला मानसिक त्रास होईल. खर्च वाढतील. अचानक झालेल्या नुकसानीमुळे रात्री झोप लागणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. इतरांना मदत करा, पण कर्ज देऊ नका.
कसा असेल तिसरा आठवडा? (Scorpio July Month Horoscope)
तिसऱ्या आठवड्यात तुमच्या आनंदात वाढ होईल. यश नवीन उंची गाठेल. काही काळ गोंधळातून आराम मिळेल. संतती सुख मिळेल. अध्यात्मिक आवड वाढेल. परंतु एखाद्याच्या मूर्खपणामुळे गोंधळ होईल. काही फायदेशीर करार तुमच्या वाट्याला येतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
कसा असेल चौथा आठवडा? (Scorpio July Month Horoscope)
चौथ्या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा आणि डोळे मिटून तुमची कौशल्यं ओळखा. उत्साहाने नव्हे, तर जाणीवपूर्वक काम करा. मुलांच्या आरोग्याची चिंता राहील. तुम्हाला तुमच्या विरोधकांकडून प्रशंसा मिळेल. कोणताही वाद मिटवला जाईल. अवाजवी खर्चामुळे तुम्हाला त्रास होईल. किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करणं चांगलं. कोणताही सकारात्मक बदल शक्य आहे. एखाद्याच्या मदतीमुळे तुम्हाला फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :