Scorpio Horoscope Today 29 April 2023 : व्यवसायात नफाही मिळेल पण व्यवहारही जपून करावा लागेल; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संमिश्र
Scorpio Horoscope Today 29 April 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरात आज नवीन पाहुण्यांचं आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
व्यवहार जपून करा
वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरात आज नवीन पाहुण्यांचं आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. तुमची रखडलेली कामेही तुम्ही आज पूर्ण करू शकता. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालणं टाळा. व्यवसायात आजचे काम उद्यावर ढकलू नका. हातात दिलेले काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गाच्या कामाच्या जबाबदारीत वाढ होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यांना आज कठोर परिश्रम घ्यावे लागतील. काही कारणाने तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. तसेच आज तुम्हाला अस्वस्थही वाटू शकते. कोणताही कायदेशीर वाद चालू असेल तर त्यात आज यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे व्यवहार करताना काळजी घ्या.
आज वृश्चिक राशीचे आरोग्य
आज तुमचा कोणताही दीर्घकालीन आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. म्हणूनच आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका.
वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय
वादविवादापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. 11 परिक्रमा करून हनुमान चालीसाचं पठण करा.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :