Saturn Transit 2022 : एप्रिल 2022 हा महिना खूप खास असणार आहे. कारण आजपासून एका महिन्यानंतर एका मोठ्या ग्रहाची राशी बदलणार आहे. या ग्रहाची राशी बदलताच जे लोक गेल्या अडीच वर्षांपासून विविध प्रकारच्या समस्यांनी त्रस्त होते,  त्यांना दिलासा मिळणार आहे. कोणता ग्रह आहे हा? जाणून घेऊया.

शनि राशी परिवर्तन 2022शनिदेव राशी बदलणार आहेत. शनीचे संक्रमण काही राशींना अनेक बाबतीत विशेष दिलासा देणारे आहे. सध्या शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. जवळपास अडीच वर्षांपासून शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. आता शनि आपली राशी बदलणार आहे. पंचांगानुसार, 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 09:57 वाजता शनि कुंभ राशीत प्रवेश करेल.

शनीची साडेसाती आणि ढैय्यासध्या काही राशींवर शनीची साडेसाती आणि ढैय्या चालू आहे. मिथुन आणि तूळ राशीवर सध्या शनीची धैय्या सुरू आहे. त्याचबरोबर धनु, मकर आणि कुंभ या तीन राशींमध्ये साडेसाती सुरू आहे. चला जाणून घेऊया 29 एप्रिलला शनीच्या या बदलापासून कोणत्या राशींना दिलासा मिळणार आहे-

धनु राशीच्या लोकांना होणार लाभशनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच धनु राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. विशेष म्हणजे धनु राशीवर साडेसात वर्षांनंतर शनीची दशा संपणार आहे. बऱ्याच दिवसांनी या राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शनीच्या राशी बदलामुळे धनु राशीच्या लोकांसाठी पैसा, आरोग्य, नोकरी, शिक्षण इत्यादी कामातील अडथळे दूर होतील.

या राशींना मिळेल शनिदेवाच्या ढैय्यापासून मुक्तीशनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळेल. गेल्या अडीच वर्षांपासून तुम्ही ज्या संकटांशी सामना करत होता, त्यापासून तुम्हाला आराम मिळेल. पैसा असेल आणि उत्पन्न वाढेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

संबंधित बातम्या

Rahu Ketu Transit 2022 : राहु-केतू संक्रमण, 12 एप्रिल नंतर 'या' राशींना राहावे लागेल सावध

Gudi Padwa 2022: ‘या’ दिवशी साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व

Zodiac Sign : 'या' तीन राशींवर असते ग्रहांची नजर, बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर पाडू शकतात प्रभाव