Zodiac Sign :  ग्रह जेव्हा बलवान आणि लाभदायक स्थितीत असतात तेव्हा त्यांना जीवनात विशेष यश मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. प्रत्येत ग्रहाच्या प्रभावानुसार,  व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य वेगळे असते. बुध आणि शनि ग्रह हे बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. बुध आणि शनि ग्रहांचा प्रभाव असलेली मुलं-मुली बुद्धिमान मानले जातात. ते बुद्धिमत्तेच्या जोरावर करिअरमध्ये यशस्वी होतात. 


मिथुन (Gemini) : ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीची मुलं-मुली अतीशय हुशार असतात. ते त्यांच्या करिअरमध्ये खूप यश यशस्वी होऊन भविष्यात उद्योगपती बनतात. मिथुन राशीचा अधिपती हा बुध ग्रह आहे. त्याच्या प्रभावामुळे ते जीवनात वेगाने प्रगती करतात. ज्या व्यक्तींचे नाव 'अ', 'च' आणि 'ड' ने सुरू होते त्यांची रास मिथुन असते. 


कन्या (Virgo) : कन्या राशीचे व्यक्ति बुद्धिमान असतात. या लोकांना पैसे कमविण्याची तीव्र इच्छा असते. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असते. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते प्रत्येक गोष्टीत यश मिळवतात. ज्या लोकांचे नाव धो, पा, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे आणि पो ने सुरू होते त्यांची रास कन्या असते. 


मकर (Capricorn) : मकर राशीचा अधिपती शनि ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा कायम राहते. ते मेहनती असतात. मकर राशीच्या मुली करिअरमध्ये यश मिळवतात. ज्या लोकांचे नाव भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी, है ने सुरू होते त्यांची रास मकर असते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha