Rahu Ketu Transit 2022, Rahu-Ketu Gochar 2022 : 12 एप्रिल 2022 रोजी 18 वर्षांनंतर राहु पुन्हा एकदा मेष राशीच्या मध्यभागी आला. या दिवशी राहू आणि केतू या ग्रहांच्या राशी बदलत आहेत. हे परिवर्तन वृषभ, मिथुन  आणि मीन या राशींसाठी कसे असेल ते पाहूयात...


वृषभ रास (Taurus)


राहु अजूनही वृषभ राशीत भ्रमण करत होता. राहु हा 12 एप्रिल रोजी वृषभ राशीतून प्रस्थान करेल. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. राहुच्या प्रस्थानामुळे तुमच्या आयुष्यात अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. लग्झरी लाइफमध्ये काही गोष्टींची कमी जाणवू शकते. जर तुम्ही कोणती मौल्यवान वस्तू खरेदी करत असाल, तर तुम्हाला त्यामध्ये समस्या जाणवू शकतात. राहुचा वाणीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खोटं बोलणं टाळा. नियम आणि शिस्तीचे पालन करा.  


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीनं राहु-केतू संक्रमण सुरू असताना सावध राहावं. आर्थिक गोष्टी आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. तसेच आर्थिक बचत करण्याकडे विशेष लक्ष द्या. कर्ज देऊ नका. लोकांचा आदर करा. शत्रु त्रास देऊ शकतो. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम बाळगा. आळस आणि वाईट सवयींपासून सावध राहा. टार्गेटवर फोकस करा. 


मीन रास (Pisces)


मीन रास असणाऱ्यांनी खर्च करणं टाळा. प्रवास करावा लागेल. स्वभाव विनम्र ठेवा. स्वच्छते संबंधित नियमांचे पालन करा. वाईट लोकांच्या संगतीमुळे त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत वाद, भांडण करण टाळा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)


Gudi Padwa 2022: ‘या’ दिवशी साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha