Sankashti Chaturthi 2025 : हिंदू पंचांगानुसार, उद्या म्हणजेच 17 जानेवारीच्या दिवशी संकष्ट चतुर्थी (Sankasht Chaturthi) साजरी केली जाणार आहे. संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याला साजरी केली जाते. मात्र, यंदाची संकष्ट चतुर्थी ही खास असणार आहे याचं कारण म्हणजेच नवीन वर्षाची ही पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे. मान्यतेनुसार, या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती लाभते.  


पौराणिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाची विधीवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात धन-संपत्ती येते. तसेच, काही मान्यतेनुसार, असं देखील म्हटलं गेलं आहे की, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टींचं दान करणं फार शुभ मानतात. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


काळे तीळ 


संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काळे तीळ दान करणं फार शुभ मानलं जातं. हिंदू धर्म मान्यतेनुसार, काळ्या तिळांमध्ये अनेक देवतांचा वास असतो. त्यामुळे ते दान केल्याने पुण्य फळ मिळतं. तसेतच, शरीरही निरोगी राहतं. 


गुळाचं दान करा


मान्यतेनुसार, या दिवशी गुळाचं दान केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात. गुळाचं दान केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच, भाग्य उजळतं. त्यामुळे या दिवशी गुळाचं दान करावं. हे अत्यंत शुभ मानलं जातं. 


तूप 


संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुपाचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तूप दान केल्याने आरोग्य आणि धन-संपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. 


मीठ


या दिवशी मिठाचं दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, मीठाचं दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच, दृष्टीदोषापासून मुक्ती मिळते. त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मीठ दान करावं. 


वस्त्र दान करा 


संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उबदार कपडे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे उबदार कपडे दान केल्याने पुण्य फळ मिळेल. यामुळे तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्यास मदत होते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                           


Shani Dev : शनी-यममुळे जुळून येणार अर्घकेंद्र योग, 22 जानेवारीपासून 'या' 3 राशींचं नशीब पालटणार; हातात पैसा खेळणार