Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायाधीश शनीला (Shani Dev) नवग्रहांमध्ये सर्वात अधिक प्रभावशाली ग्रह मानला जातो. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीत जरा जरी बदल झाला तर त्याचा अनेक राशींवर परिणाम होतो. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत राहतात. तर, संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी शनीला जवळपास तीस वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनी (Lord Shani) आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. या राशीत शनीचा संयोग यमसह होणार आहे.  


पंचांगानुसार, 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 24 मिनिटांनी शनी आणि यम एकमेकांच्या 45 डिग्रीवर असणार आहेत. यामुळे अर्घकेंद्र योग निर्माण होत आहे. याचा 3 राशींच्या लोकांना चांगलाच लाभ होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग फार फायदेशीर असणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात बंपर लाभ मिळेल. तसेच, तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तणापासून मुक्ती मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना या काळात नोकरीच्या अनेक संधी मिळतील. तुम्हाला बिझनेसमध्ये नवीन संधी मिळतील. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगले बदल घडलेले दिसतील. तुमच्या बिझनेसच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन योजनांवर काम करण्याची संधी मिळेल. तसेच, तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


शनी-यमद्वारे जुळून आलेला अर्धकेंद्र योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तु्म्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. व्यवसायात तुम्ही आखलेल्या योजनांवर तुम्हाला त्याचा चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा प्लॅन करु शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                                                  


Horoscope Today 16 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य